शिक्षक बँकेत कर्ज व्याजदर कपातीचा निर्णय, स्वराज्य मंडळ महिला आघाडीच्या मागणीला अंशतः यश..

| अहमदनगर / अजिंक्य फापाळे | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अवाजवी व्याजदरा विरोधात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाच्या महिला रणरागिनीनी बँकेवर निवेदनाच्या माध्यमातून हल्लाबोल केला. तात्काळ व्याजदर कमी न झाल्यास धरणे आंदोलनाचा विनंतीवजा सूचक इशारा दिला. याची परिणीती म्हणून सत्ताधार्‍यांनी नमते घेत कर्जाचा व्याजदर ०.३५% टक्के तात्काळ कमी करत सभासदांना दिलासा दिला. त्यांच्या या कार्याबद्दल अहमदनगर प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाच्या वतीने चेअरमन- व्हा चेअरमन व सर्व संचालक मंडळ तथा सत्ताधाऱ्यांचे स्वराज्य मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

मात्र अद्यापही सभासदांना अजून व्याजदर कमी होण्याची आशा आहे, त्याचबरोबर निवेदनातील दुसरी महत्त्वाची मागणी- पगार उशिराने झाल्याने सभासदांच्या खिशाला पडणारा भुर्दंड शिक्षक बँकेने तात्काळ कमी करावा याबाबतचे ठोस उपाय योजना करण्याबाबत स्वराज्य मंडळ आग्रही राहणार आहे. या संदर्भाने अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाच्या महिला रणरागिनी यांच्यावतीने केलेल्या मागण्यांपैकी व्याजदरांबाबतच्या मागणीला अंशतः यश आले आहे. तरी सभासदांच्या हितासाठी कायम कटिबद्ध असणाऱ्या स्वराज्य मंडळाचे हे यश म्हणावे लागेल. याच प्रमाणे पुढे कायम सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहून सभासदांना अधिकाधिक लाभ देण्यासंदर्भात स्वराज्य मंडळ आघाडीवर राहील, अशी ग्वाही स्वराज्य मंडळाच्या महिला रणरागिनीनी जिल्हाभरात व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *