शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा – पुष्प ८ वे : वेगवेगळ्या अफलातून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे शिक्षणं अधिकाधिक समृद्ध करणाऱ्या , शैक्षणिक साहित्य निर्मिती छंद असलेल्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शोभा दळवी..

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक हेकेखोर पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या प्राथमिक शाळा पाहता, यात तिथे काम करणाऱ्या शिक्षकांचा वाटा सर्वाधिक मोठा किंबहुना त्यांच्यामुळेच ते शक्य झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ५ सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी शिक्षकांबद्दल उपकृत होण्याचा प्रयत्न समाज करत असतो. परंतु त्याहून अफाट काम करणाऱ्या या शिक्षक रत्नांची त्यांच्या आभाळाएवढ्या कामाची अल्प माहिती सर्वांसमोर यावी त्या दृष्टीने दैनिक लोकशक्ती ४ सप्टेंबर पासून शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा ही लेखमाला सुरू करत आहोत. प्रत्येक रविवारी येणाऱ्या या लेखमालेतून असामान्य काम करणाऱ्या प्रेरणादायी अवलियांची गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडत आहोत. 

नक्की वाचत रहा..!

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा

पुष्प ८ वे : वेगवेगळ्या अफलातून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे शिक्षणं अधिकाधिक समृद्ध करणाऱ्या , शैक्षणिक साहित्य निर्मिती छंद असलेल्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शोभा दळवी .
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

२०१० साली अतिशय दूर्गम भागात माझ्या नोकरीला सुरुवात झाली. जि. प. प्रा. शा. कासारवाडी ता. गेवराई जि. बीड या शाळेत जाण्यासाठी नीट वाटही नसे. चिखल तुडवत कसेबसे शाळेला जावे लागत असे. खुप अडचणी होत्या. त्यावर उपाय काढणे यातच प्रगती होती. व्दिशिक्षिकी शाळा आमची तीला सुंदर बनवणे हेच स्वप्न उराशी बाळगून होतो आम्ही दोघी..

१०० % गाव स्थलांतर करते, मुलांना शाळेत टिकवून ठेवणे हे आमचे आद्य कर्तव्य होते. मुले शाळेत रमण्यासाठी मी अनेक टाकावु वस्तूपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य निर्मिती केली तसेच मुलांनाही तो छंद लावला. कारण मुले शाळेत टिकली तरच शिकतील ना…
महत्वाचे काही निवडक उपक्रम खालीलप्रमाणे….

✓ रोपवाटिका :

सर्व पालक ऊसतोडणीसाठी जात असल्यामुळे शाळेला आर्थिक सहकार्य लाभत नसे. परंतु शाळा डीजीटल करणे हे आमचे स्वप्न होते. मग आम्ही २००० झाडांची एक रोपवाटिका लावली. काळ्या पिशव्या आणून, इकडून तिकडून बिया गोळा करून, ग्रिनशेड उभारुन लागवड केली. हेतु एकच झाडे विकुन शाळा डिजिटल करणे या कार्यात पालकांनी खुप सहकार्य केले. द्विशिक्षिकी शाळेतील आमचा हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलाच रोपवाटिकेचा प्रयोग होता. हा उपक्रम राज्याच्या पोर्टलवर प्रसिद्ध झाला. अनेक वृत्तपत्रात बातमी आली. त्यावेळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नवरे साहेब, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी माळी साहेब यांनी भेट देऊन कार्याचे कौतुक केले व शाळा डिजीटलसाठी मदत केली. हे खुप मोठे यश होते.

✓ डिजिटल साहित्य :

रोपवाटिका उपक्रमामुळे अनेक मदतीचे हात पुढे सरसावले…. युक्रांत संघटनेने शाळेला संगणक दिला. एकलव्य संघटनेने प्रोजेक्टर दिला. ग्रामपंचायतेने लगेच टिव्ही दिला.
माझी शाळा डिजीटल झाली. आणि स्वप्न साकार झाले.

✓ You tube channel :

विविध शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करुन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे. माझे Shobha Dalvi हे चॅनल महाराष्ट्रातील विदयार्थ्यांसाठी दिशा दर्शक ठरत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. सर्व उपक्रमाचे व्हिडिओ चॅनेल वर उपलब्ध आहे.

✓ शैक्षणिक साहित्य निर्मिती :

विद्यार्थ्यांसाठी टाकाऊतून टिकाऊ साहित्य निर्मिती करणे हा माझा आवडता छंद आहे. तालुका स्तरावरीय वारीमध्ये माझे साहित्य मांडण्याची संधी देखील मिळाली. काही साहित्यांची नावे – भोपळा साहित्य, वाचन लेखन सिडीज, संख्याटोपणे, मुळाक्षरांचा वाढदिवस, वाचनगृह, मॅजिक बाॅल, शैक्षणिक पत्ते, चौदाखडी खिडकी, गणित चरखा, आनंददायी भागाकार, पाढ्यांची तोफ इ. अनेक शैक्षणिक साहित्य निर्मितीमधुन मुले घडवण्याचे कार्य घडले.

यामुळे मला जिल्हा व राज्य विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटातून सहभागाची संधी मिळाली.

✓ इ-शैक्षणिक साहित्य :

टाकाऊतून टिकाऊ साहित्याबरोबर e-शैक्षणिक साहित्य ही बनवले आहेत. व्हिडिओ निर्मिती, गुगल फॉर्म, फ्लिपबुक, स्मार्ट pdf, online test, QR code निर्मिती, इ. अनेक मार्गातून तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर करुन माझे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट देण्याचा माझा मानस असतो.

✓ कलेतून शिक्षण :

मुलांच्या creativity ला वाव मिळावा व मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी मी ‘शनिवार माझ्या आवडीचा’ हा उपक्रम राबवत असते. या उपक्रमांतर्गत भरपुर कृती केलेल्या आहेत. उदा. तिरंगी बॅच, कागदी फुल, कागदी बेडूक, होडी, चष्मा, चाॅकलेट रॅपलपासुन फुलपाखरू बनवणे, हार बनवणे, मॅजिक बाॅल बनवणे, विविध प्रयोग, भेटकार्ड बनवणे, फिंगर पपेट बनवणे, आकाशकंदील बनवणे, कॅरिबॅग फुले इ.

✓ स्पर्धा परीक्षा :

इयत्ता दुसरीपासुन प्रज्ञाशोध, मंञा, स्कॉलरशिप याची तयारी करुन घेतली जाते. माझा एक विद्यार्थी राज्य मेरिट लिस्ट मध्ये आला आहे.

✓ इतर उपक्रम :

● नवोपक्रम स्पर्धेत जिल्ह्य़ातुन सलग दोनदा क्रमांक पटकावला आहे.
● सर फाॅडेंशनचा Innovative awards ने सन्मानित आहे.
●पुरस्कार – दक्ष पञकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, यशवंतराव होळकर राज्य स्तरीय पुरस्कार, राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार, अनेक काव्य सन्मान, अनेक काव्य, लेख स्पर्धेत बक्षिस पाञ.
●आकाशवाणी वर काव्य सादरीकरणाची संधी.
●सर फाॅडेंशनची समन्वयक, जीवन गौरव सहसंपादक तसेच काव्यप्रेमी शिक्षक सभासदाचेही कार्य पहाते.
●सिईओ साहेबांनी गावासमोर केलेले कौतुक आणि सन्मान हा सर्वोच्च पुरस्कार होता.

✓ सध्याची शाळा :

गेल्यावर्षी माझी बदली जि. प. प्रा. शा. रसूलाबाद केंद्र. चकलांबा ता. गेवराई जि. बीड येथे झाली आहे. तेथेही वृक्षारोपण, मूल्यवर्धन व गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवत आहे.

✓ अवलिया शिक्षक परिचय :

श्रीम शोभा सुरेश दळवी (शिक्षिका)
जि.प.प्रा.शा.रसूलाबाद, केंद्र – चकलांबा, ता. गेवराई जि. बीड
9657326698

✓ ताईंना मिळालेले पुरस्कार, सन्मान, बक्षिसे :

● २०१८ मध्ये सकाळ वृत्तपञात व e-सकाळवर माझा “कौन बनेंगा ब्रिलीयंट” हा नवोपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. माझा गाव माझी टेकडी तसेच बरेच उपक्रम पूढारी व सकाळ मध्ये प्रसिद्ध आहेत.
● रोपवाटिका या राज्यस्तरीय उपक्रमाची नोंद घेउन मुख्य कार्यकारी अधिकारी, उप.मु.का.अधिकारी, विस्तारअधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेत येऊन गावासमोर सत्कार करुन भेटवस्तू दिली
● दक्ष पञकार गेवराई संघाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला.(२०१८)प्राप्त.
● राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०१८
● कास्ट्राईब महासंघाचा प्रेरणास्तंभ पुरस्कार २०१८
● राज्यस्तरीय जीवन गौरव तर्फे कवयिञी पुरस्कार २०१८
● घाटंजी राज्यस्तरिय काव्य महोत्सवात सन्मानचिन्ह, प्रमाणपञासह सन्मान.
● माझ्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार-२०१८
● बीड ग्रंथोत्सव काव्य सन्मान-२०१८
● साविञी सन्मान,चकलांबा-२०१९
● जीवन गौरव अंभंग स्पर्धा सन्मान,औ.बाद-२०१९
● राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार , २०१९
● शाळेने व ग्रामस्थांनी साडी, शाॅल,श्रीफळ देवून केलेला सन्मान हा माझा मोठा पुरस्कार होता.
● राज्यस्तरीय व तालूकास्तरिय शिक्षणाच्या वारीसाठी निवड
● जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये, शै.साहित्यमध्ये व्दितीय क्रमांक..
● नवोपक्रम स्पर्धा २०१९, जिल्हात व्दितीय क्रमांक प्राप्त.
● डायटच्या पथकाकडून पतीसह केंद्रात सत्कार
● बालसाहित्य महोत्सव गेवराई योगदानाबद्दल सन्मान
● आकाशवाणीवर स्वलिखित कविता सादरीकरण संधी प्राप्त.
● माझ्या अनेक कविता वर्तमानपत्रात, दिवाळी अंकात प्रकाशित..
● महाराष्ट्र शिक्षक पॅनल पुरस्काराच्या निवडसमितीत निवड.
● जीवनगौरव पुणे संमेलनात कवियिञीचा सन्मान २०१८.
● सर फौंडेशनच्या नवोपक्रमात तसेच State innovative Award साठी निवड.
● जीवनगौरव नाशिक संमेलनात कवयिञी म्हणून सन्मान.
● विविध स्पर्धेचे १३०डिजीटल प्रमाणपञ प्राप्त.
● अनेक कार्यक्रमात सुञसंचालनाची संधी प्राप्त.
● श्रावणधारा काव्यमहोत्सवात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित.
● राज्य विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग २०१९

✓ शैक्षणिक कार्य :

● अडिच हजाराची रोपवाटिका उपक्रमातून रोपे विकून व्दिशिक्षिकी शाळा डिजीटल केली

● माझ्या विद्यार्थीची NSSE &MANTRA EXAMमध्ये राज्य मेरिटसाठी निवड.
● लवकरच उपक्रमपुस्तीका प्रकाशनाचा मानस आहे.
● स्वच्छतेवर आधारित स्वरचित नाटिका प्रसिद्धआहे.
● ज्ञानरचनावादावर १००-१५० साहित्य मिर्मिती केली आहे.
● तालूकास्तरीय शिक्षणाच्या वारीत शै.साहित्याचा स्टाॅल लावण्याची संधी मिळाली.
● राज्यस्तरीय शिक्षणाच्या वारीत शै.साहित्य मांडण्याची संधी.
● स्वत:चे Youtube channel तेथे भरपूर शै.व्हिडीओ अपलोड केलै आहे.
● नवोपक्रम स्पर्धेत दोनवेळेस निवड.
● शाळेचा रोपवाटििका उपक्रम राज्याच्या पोर्टलवर प्रकाशित.
● जीवन शिक्षण मासिकात माझ्याशाळेची व माझ्या उपक्रमांची माहिती विस्तारअधिकारी मार्फत प्रदर्शन

✓ सामाजिक कार्य :

● जवळपास १५० झाडांचे रोपण.
● विधवांना साडीचोळी व हळदीकुंकवाचा सन्मान सोहळा.
● मुलांना वही, पेन, औषधांचे वितरण.
● फक्त मुलींना जन्म देणार्‍या महिलांचा साडी देवून सन्मान.
● अनाथालयास आर्थिक मदत.
● श्रमदानाचे कार्य.

✓ साहित्यीक कार्य :

● भरपूर चारोळी लेखन
● पाच काव्यसंमेलनात काव्य सादरीकरणाची संधी.
● तीस लेख लेखन केले.
● विविध काव्यस्पर्धेत सहभाग.
● १५० कवितांचे लेखन.
● काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होणार.

✓ प्रकाशित साहित्य :

● चंपावती पञ-स्ञी जीवन
● जागर परिवर्तनाचा-वृद्धाश्रम काव्य
● काव्यप्रेमी दिवाळी अंक-शै.लेख
● जनअंकुश-स्ञी कहाणी
● सायबर क्राईम-संविधान
● सायबर क्राईम-साविञी
● हिरकणी बुरुज पुस्तक-अनिकेत आणि मी[लैख]● जीवन गौरव मासिक-भाकर कविता,
● पुण्य नगरी, कविता स्वातंञ्याच्या-स्वातंञ दिन

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा: पुष्प ७ वे – वेगवेगळ्या अफलातून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे शिक्षणं अधिकाधिक आनंदी करणाऱ्या बहुआयामी शिक्षिका श्रीमती वैशाली भामरे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *