AIL – Art integraded learning म्हणजे कलेचा इतर विषयांशी सहसंबंध जोडून शिकणे. शिक्षणाचा मूळ पाया म्हणजे ‘कला’. कला म्हणजे जीवन. ‘रस्किन’ या तत्ववेत्त्याने म्हटले आहे , जिथे हात काम करतात,
तेथे हस्तकला; जेथे बुद्धी काम करते, तेथे कौशल्य आणि जेथे हात आणि बुद्धी हृदयापासून काम करतात तेथे कलेची निर्मिती होते. म्हणूनच
Hand + Head + Heart = Art.
याद्वारे चित्र, शिल्प, गायन, वादन, नृत्य, नाट्य या प्रमुख ललीत कलांचा विकास होत असतो.
तरीही बर्याचश्या शाळेत कला विषय दुर्लक्षित राहतो. इतर विषयांचा सहसंबंध कलेशी जोडला तर त्या घटकाचे परिणामकारकरित्या सहज आकलन होते. NCERT नवी दिल्ली येथे घेतलेल्या AIL च्या कार्यशाळेत कलेसंबंधी नवी दृष्टी मिळाली. सदर कार्यशाळेत कला विभागाच्या प्रमुख डाॕ. पवन सुधीर यांच्या मार्गदर्शनाने नवी प्रेरणा मिळाली.
कलेचा संबंध इतर विषयांशी जोडल्यामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी होते. क्लिष्ट संकल्पना व संज्ञा कृतीच्या साह्याने स्पष्ट करता येतात. AIL मध्ये Process is important than product . आजपर्यंत आपण product ला जास्त महत्त्व देत होतो परंतु AIL नुसार process म्हणजेच प्रक्रियेला अधिक महत्त्व आहे. यात सर्व विद्यार्थांचा सहभाग अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती , त्याच्या विचारांना जास्त महत्त्व आहे.
AIL ची सर्वसाधारण उद्दिष्टे :
✓ अभिव्यक्ती कौशल्याचा विकास करणे.
✓ निरीक्षणक्षमता , स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्तीचा विकास करणे.
✓ विचारांच्या कक्षा रुंदावणे.
✓ प्रक्रियेला ( process ) जास्त महत्त्व देणे.
✓ सर्व विद्यार्थांचा कृतीयूक्त सहभाग घेणे.
✓ आनंददायी पद्धतीने अध्ययन अध्यापन करणे.
✓ मुलांचे भावविश्व जाणून घेऊन स्वनिर्मीत साहित्यांची रचना करणे.
✓ स्वतंत्र विचार करण्याची सवय लावणे.
✓ सादरीकरणात स्थानिक आणि प्रादेशिक कलांचा आंतर्भाव करणे.
✓ प्रकटीकरणासाठी आत्मविश्वास वाढवणे.
✓ संवादासह आणि संवादाशिवाय देहबोलीचा परिचय करुन देणे.
✓ एकाग्रता निर्माण करणे.
✓ सांघिक भावना वाढीस लावणे.
✓ कलेविषयी प्रेम निर्माण करणे.
कलेच्या माध्यमातून विद्यार्थी अभिव्यक्त होत असताना शिक्षकाची भूमिका सुलभकाची असल्याने गाणे, नृत्य, संवाद इ. चे लेखन विद्यार्थी स्वतः करतात. विद्यार्थी उपलब्ध परिस्थितीत उपलब्ध साधनांचा उपयोग करुन सादरीकरण करतात. जसे एखाद्या कवितेचे गायन करायचे असल्यास पेटी, तबला इ. साहित्य नसेल तर डबा, ताट, झाकण, बाटली, बेंच, काड्या, टाळ्या इ. साहित्याचा वापर करुन संगीत निर्मिती करतात आणि कवितेचे साभिनय गायन करतात.
लोकनृत्य , लोकगीत यातील अर्थ महत्त्वाचा असतो.यांत सामाजिक जीवनाचे चित्रण केलेले असते ही दृष्टी विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे.काही घटक नृत्याच्या साह्याने हावभावयुक्त स्पष्ट करावेत. जसे गणितातील भौमितिक आकृत्या आणि त्याचे गुणधर्म नृत्याद्वारे स्पष्ट करावेत.
क्लासरुम थिएटर ( classroom theatre ) हा AIL चा आत्मा आहे. मेकअप , ड्रेस , स्टेज इ.चौकटीत न अडकता विद्यार्थी शाळेच्या गणवेशात वर्गातील उपलब्ध वस्तुंचा उपयोग करुन पाठ्यपुस्तकातील घटकाचे नाट्यीकरण करतात. तयार केलेल्या मुखवट्यांच्या साह्याने अभिनय करतात.
पाच ज्ञानेंद्रियांपैकी जास्तीतजास्त ज्ञानेंद्रियांचा वापर अध्ययन अध्यापनात केला तर दिलेले ज्ञान चिरकाळ स्मरणात राहते. म्हणून ‘No fear..just dare’ या उक्तीप्रमाणे मुलांना पुढे यायची संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसे वातावरण वर्गात निर्माण करावे.
कल्पनाशक्ती विकसित करताना Roll play खूप महत्त्वाचा आहे. पाठ्यपुस्तकातील विषयानुरुप घटकानुरुप Roll play चे पात्र निवडावे.
उदा. सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय करुन द्यायचा असल्यास..
• वर्गातील एखाद्या मुलीला सावित्रीबाईंचे पात्र देऊन तिला खूर्चीवर समोर बसवून इतर विद्यार्थ्यांना तिची मुलाखतीद्वारे प्रश्न विचारण्यास सांगावे.याप्रमाणे घटक आत्मसात करावा.
• विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात..
जसे… सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाचे काम बंद करायला हवे का? की सुरुच ठेवावे???
• अपूर्ण विधान पूर्ण करा.
जसे, सावित्रीबाईंनी …… काम केले.
• सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाचे काम केले.
• सावित्रीबाईंनी समाजसेवेचे काम केले .
याप्रमाणे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे वाक्य पूर्ण करतील.
Karaok Track व Simple voice changer यांसारख्या apps च्या साहाय्याने पाठय पुस्तकातील कविता, देशभक्तीपर गीते, प्रार्थना, स्वागत गीते इ. चे रेकॉर्डिंग करून विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव दिला. स्वातंत्रदिन, शिक्षण परिषदेत यावरील कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.
चित्ररेखाटन व वेशभूषेद्वारे पाठ्यपुस्तकातील पात्र व त्यांचे स्वगत याद्वारे घटक स्पष्ट केला. उदा. संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई यासारख्या भूमिका वेशभूषा व स्वागताद्वारे स्पष्ट केल्या.
दररोज वर्गासमोर परिसरात मिळणारे दगड व शंख यांचा वापर करून विद्यार्थी शैक्षणिक रांगोळी काढतात व नवनिर्मितीचा आनंद घेतात.
मुकाभिनय, नाट्यीकरण, संवाद, मुलाखत इ. प्रकारच्या वेगवेगळ्या तंत्रांचा उपयोग करून मुले समृद्ध होत आहेत. यासाठी मुखवटे, पापेटस, बोलक्या बाहुल्या इ. चा वापर करतात.
वर्गरचना करताना चौरस, त्रिकोण, आयत, समभूज चौकोन इ. प्रकारच्या रचना करून त्याच्या बाजू, कोन, कर्ण, संमुख भुजा इ. स्पष्ट केले. रंजक पद्धतीने संकल्पना स्पष्ट केल्याने हसत खेळत अध्ययन अध्यापन क्रिया घडते.
AIL शी संबंधित उपक्रम www.jyotideepakbelawale.com या संकेतस्थळावर, jyotideepakbelawale.blogspot.in या ब्लाॕगवर तसेच Jyoti Belawale या शैक्षणिक युट्यूब चॕनेलवर प्रसिध्द केले आहेत.
AIL च्या वापराने विद्यार्थ्यांना शाळेची आणि शिक्षणाची आवड निर्माण झाली. उपस्थितीचे प्रमाण वाढले. अध्ययनात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन त्यांचा सक्रिय सहभाग मिळाला. वयानुरूप विद्यार्थी आनंदाने सक्रिय सहभाग घेऊ लागले. अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ झाली.कारण कृतीतुन आनंद , आनंदातुन शिक्षण आणि शिक्षणातुन कौशल्ये विकसित होतात.
कलेचा सहसंबंध इतर विषयाशी जोडून उपलब्ध परिस्थितीत उपलब्ध साहित्याद्वारे वेगवेगळे अध्ययन अनुभव देणारे AIL हे आनंददायी अध्यापनाचे तंत्र आहे.
– सौ. ज्योती दीपक बेलवले, जि.प. प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र – सापगाव, ता – शहापूर, जि. – ठाणे. ( लेेेेखिका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत. )
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .