| पुणे / महादेव बंडगर | श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने नुकतीच सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ५ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात फरारी असणारा आरोपी सुरेश देवराम गायकवाड, राहणार- भिंगार तालुका -श्रीगोंदा यास अटक करून सोन्या-चांदीचे मंगळसूत्र, टॉप्स , मोहनमाळ,
सोन्याची चेन असे १६ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, २ मोटरसायकल त्यामध्ये एक होंडा शाईन व स्प्लेंडर गाडीचा समावेश आहे. तसेच एक मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला आहे. त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दि.१५ डिसेंबर २०१९ मध्ये तुलसाईनगर ,काष्टी येथे बंद घरात कुलूप तोडून घरफोडी झाली होती. तेथून सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेले होते त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ११५१/२०१९ भा द वि ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता.
तसेच अविनाश शिवराज भोसले राहणार खंडाळा तालुका कर्जत व दिलीप उर्फ देख्या शांताराम चव्हाण यांच्याकडून तीन ग्रॅम चे सोन्याचे मंगळसूत्र, एक चोरीचा मोबाईल व चांदीचे पैंजण असा २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ३ सराईत गुन्हेगारांना अटक करून ३ जबरी चोरी, ४ घरफोडी, २ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण ५ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल श्रीगोंदा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याप्रकरणी मा. पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत होते. दिनांक १६/९/२०२० रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सपोनि राजेंद्र सानप, पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश ढवळे , प्रकाश मांडगे, पो कॉ गोकुळ इंगवले, संजय काळे , योगेश सुपेकर, प्रताप देवकाते, प्रशांत राठोड यांनी तांत्रिक व गोपनीय पद्धतीने तपास करून वरील आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठांकडून तसेच तालुक्यातील नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .