| मुंबई / बीजिंग | जगभरात सध्या कोरोनावरील लसीकडे डोळे लागले असताना चष्मा लावल्याने कोरोनाच्या संसर्गाला दूर ठेवता येते, असा दावा चिनी संशोधकांनी केला आहे. ”जामाऑफ्थामॉलॉजी’ या वैद्यकीय विषयाला वाहिलेल्या मासिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. दररोज चष्मा लावल्याने कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते, असे यात म्हटले आहे. यासाठी संशोधकांनी हुबेईतील २७६ कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण केले.
दररोज आठ तासांपेक्षा जास्त वेळ चष्मा लावणाऱ्यांचा अभ्यास यातून करण्यात आला. २७६ रुग्णांपैकी १६ जण (सहा टक्क्यांपेक्षा कमी) रोज जास्त वेळ चष्मा लावत असल्याचे निदर्शनास आले. त्या सगळ्यांमध्ये लघुदृष्टिदोष होता. याची तुलना हुबेई प्रांतातील अन्य लोकांशी केली असता दृष्टीदोषाचे प्रमाण ३१.५ टक्के एवढे आढळले. म्हणजेच सामान्य नागरिकांपेक्षा दृष्टीदोष असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होते.
या अभ्यासाला मात्र मर्यादा :
हे संशोधन कमी लोकांवर केले असून, ते एकाच ठिकाणी केले आहे. चष्मा वापरणाऱ्यांची संख्या ही पूर्वीच्या अभ्यासावर आधारित आहे. आताच्या स्थानिक पातळीवरील संख्या गृहीत धरलेली नाही. लघुदृष्टी असलेल्यांचे प्रमाण निश्चित करताना दृष्टिदोष असूनही चष्मा न वापरणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली असली तरी ती मर्यादित स्वरूपात आहे. हा अभ्यास कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात केला आहे.
दरम्यान, ”हा अभ्यास प्राथमिक पातळीवर झाला असून, त्याबाबत खात्रीशीर माहिती देता येणार नाही. या निष्कर्षाला पर्याय असू शकतात. उदा. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी चष्म्याबरोबरच अन्य अज्ञात व दुर्लक्षित राहिलेल्या घटकांचाही वापर केला तर उपयुक्त ठरू शकेल, असे मत ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन’च्या साथरोग विशेषज्ञ डॉ. लिसा एल. मार्गाकिस यांनी व्यक्त केले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .