हे आहेत पुणे विभागातील मुख्यमंत्र्यांचे सल्लागार..! अजित दादांवर साधला निशाणा..?

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सल्लागार म्हणून पुणे विभागात दीपक म्हैसकर यांची नेमणूक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांच्या मर्जीतले जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त असताना मुख्यमंत्र्यांनी ही नेमणूक केल्याने राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी केलेल्या काही नियुक्त्या या चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात कारभार सुरू केल्यानंतर मुख्य सचिव अजोय मेहता आणि त्यांची गट्टी जमली. अजोय मेहता यांची प्रत्येक शासकीय निर्णयातील वर्चस्व, घेतलेले निर्णय बदलण्यासाठी वापरलेले वजन यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजीचा सूर लावला. अजोय मेहता यांच्यामुळे प्रशासकीय अधिका-यांमध्ये देखील नाराजी होती. ती नाराजी पाहता अखेरीस उद्धव ठाकरे यांनी अजोय मेहता यांना मुदतवाढ न देता त्यांना प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक केली.

Leave a Reply

Your email address will not be published.