हा आहे मुंबईतील नवा हॉटस्पॉट ; इथे वाढतोय धोका

| मुंबई | वरळी, धारावी पाठोपाठ आता मुंबईत नवा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत आहे. बीएमसीच्या ‘एन’ वॉर्ड म्हणजेच घाटकोपर हा परिसर सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी घाटकोपरमध्ये कोरोनामुळे ५७५ लोकांनी आपला जीव गमावला आहे. मुंबईतील इतर वॉर्डापेक्षा हा आकडा मोठा आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, शनिवारी मुंबईत ६,६४५ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये ‘एन’ वॉर्डमध्ये सर्वाधित लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ ‘के-ईस्ट’ वॉर्डमध्ये ४६० बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ‘के-ईस्ट’ परिसर म्हणजे विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरीचा परिसर आहे. घाटकोपरमध्ये शहरातील इतर भागापेक्षा कोरोनाबाधितांचा आकडा हा ९% ने जास्त आहे.

दरम्यान, घाटकोपर हा देखील दाट लोकवस्तीचा परिसर आहे. यामुळे येथील रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. घाटकोपर परिसरात झोपडपट्टींचा देखील विळखा आहे. अशावेळी कोरोनाचे रूग्ण शोधणं, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रॅक कर करणं आणि त्यांना क्वारंटाऊन करणे, उपाय करणं या सगळ्या गोष्टीत अडचणी येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *