हे माहीत आहे..? केवळ भारतातच नाही तर ‘या’ देशातही आजच साजरा होतो स्वातंत्र्य दिवस !!

| मुंबई | १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. आज भारतात ७४ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. मात्र, आजच्याच दिवशी फक्त भारतच नाही तर, जगातील आणखी चार देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं. भारताव्यतिरिक्त ज्या चार देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं त्या देशांमध्ये दक्षिण कोरिया, बहरिन, लिकटेंस्टीन आणि कांगो या देशांचा समावेश आहे.

खरं तर आपल्या देशाला ब्रिटीश १९४७ रोजी नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच १९४८ रोजी स्वतंत्र करणार होते. पण महात्मा गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनाने ब्रिटिशांना सळो की पळो केलं होतं. त्यामुळे वैतागलेल्या ब्रिटीशांनी एक वर्षाआगोदर १५ ऑगस्ट १९४७ रोजीच स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला.

१. दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया :

जपानच्या अधिपत्याखाली असलेल्या कोरियाला १५ ऑगस्ट १९४५ रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. १९१० ते १९४५ पर्यंत कोरिया जापानच्या गुलामगिरीत होता. आज आपण ज्या देशांना दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया म्हणून ओळखतो, ते आधी एकत्र होते. त्यानंतर १९४८ मध्ये त्यांना दोन देशांमध्ये वेगळं करण्यात आलं.

२. बहरीन :

१५ ऑगस्ट १९७१ पर्यंत मुळचा अरबांचा देश असलेला बहरिन ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता. सध्याची बहरिनची राजधानी मनामा आहे.

३. कांगो :

१५ ऑगस्ट १९६० रोजी कांगो फ्रांसपासून वेगळा झाला. कांगो जवळपास ८० वर्षांपर्यंत फ्रान्सच्या गुलामगिरीत होता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील ११ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.

४. लिकटेंस्टीन :

हा एक अतिशय छोटा देश आहे. याला जर्मनीकडून १५ ऑगस्ट १८६६ रोजी स्वातंत्र्य मिळाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *