
| ठाणे | कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्याला राज्य सरकारने ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये ठाणे ५ कोटी, कल्याण-डोंबिवली महापालिका १० कोटी, नवी मुंबई महापालिका १० कोटी आणि मीरा-भाईंदर महापालिका १० कोटी यांचा समावेश आहे. संपूर्ण कोकण विभागासाठी १०९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून औरंगाबाद विभागासाठी २० कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. अशा एकूण१२९ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक ३५ कोटी रुपये ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता येथे प्रभावी मुकाबल्यासाठी वाढीव निधी मिळावा, यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही प्रयत्न केले होते. ही मागणी मंजूर झाल्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्याला आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करून खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..