२०० विशेष ट्रेन धावणार.. हे आहेत नियम..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला होता. दरम्यान, परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक जून पासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या धावणार आहेत. तसा रेल्वेने निर्णय घेतला आहे. त्यासाठी नव्या वेळापत्रकानुसार या गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या बुकींगला आज गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत.

 १ जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या सुरु होणार आहेत. या रेल्वे कोणत्या आहेत आणि याबाबतचे वेळापत्रक रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. या स्पेशल २०० रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरु झाले आहे. यामधील ५० रेल्वे या मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या आहेत. 

दरम्यान, आधी रेल्वे प्रशासनाने केवळ नॉन एसी रेल्वे गाड्या धावणार असे स्पष्टे केले होते. आता एसी आणि जनरलचा डब्बा असेल स्पष्ट केले आहे. तिकिटाचे बुकिंग फक्त आयआसीटीसीच्या वेबसाइट आणि अ‍ॅपवरून करता येणार आहे. रेल्वेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार या रेल्वेमध्ये आरएसी आणि वेटिंग तिकिटे दिली जातील. मात्र, वेटिंग तिकटवाल्यांना रेल्वेत चढण्याची किंवा जाणाच्या परवानगी देण्यात आलेले नाही. म्हणजेच आरक्षण असणाऱ्यांना प्रवास करता येणार आहे.

हे नियम पाळणे बंधनकारक : 
रेल्वे सुटण्याच्या आधी प्रवाशांनी रेल्वे स्थानकात ९० मिनिटे आधी येणे बंधनकारक आहे. त्याशिवाय सर्व प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. ज्यामध्ये त्या प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आहेत का, याची तपासणी होणार आहे. ज्या प्रवाशाला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशाच प्रवाशांना रेल्वेत प्रवेश दिला जाणार आहे. चादर, ब्लँकेट आणि पडदे दिले जाणार नाहीत. प्रवाशांनी घरातून निघताना आपले सामान घेऊन निघावे. तसेच सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करणे बंधनकारक आहे. त्यासोबत फेसमास्कही बंधनकारक करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *