खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करण्याबाबत खबरदारी घ्या – पालकमंत्री एकनाथ शिंदे



| ठाणे | आता जून महिना जवळ येऊ लागल्याने खरीप हंगामाची सुरवात लवकरच होणार आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषि निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, जास्त दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करावे अशा सूचना ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ठाणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठकित दिल्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या पिकांचे नियोजन, बी-बियाणांची उपलब्धता, रासायनिक खते, औषधे आदी बाबींच्या पूर्वतयारीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्हयात ६५ हजार ९०९ हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, नगली, तृण धान्य, कडधान्य, गळीत धान्य क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी ११ हजार ५०० क्विंटल बियाणांची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते कृषि निवीष्ठा उपलब्ध करुन देण्यासोबतच यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हयगय करु नका. कृषि निवीष्ठाबाबत लक्ष ठेवणे आवश्यक असून यामध्ये जादा दराने विक्री होणार नाही तसेच याबाबत शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचनाही देखील पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता दर्जेदार असावी असे अधोरेखित करीत कृषि विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व त्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वेळेवर करणे, आतपर्यत ५ कोटी चे वाटप झाले आहे. उर्वरीत वाटप लवकर करावे, तसेच पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच कोरोनामुळे शेतकरी संकटांत आहे. त्यांना सर्व सुविधा तात्काळ बांधावर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व नियोजन काटेकोरपणे करावे अश्या कडक सूचना त्यांनी बैठकीत दिल्या आहेत.

दरम्यान, या वेळी कृषी अधिक्षक माने यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख देखील अधिकारी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *