| सांगली | जत तालुक्यातील डफळापूर नजिकच्या चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले. त्यात मदतनीस शिक्षक जागीच ठार झाला. नानासाहेब(पिंटू) सदाशिव कोरे वय- 36, रा.डफळापूर (शाळा कोळी वस्ती, डफळापूर)असे ठार झालेल्या शिक्षकांचे नाव आहे. तर पोलिस ऑपरेटर संजय बसगौंडा चौगुले हा यातून थोडक्यात बचावला आहे. दरम्यान परवा ठाण्यातील शिक्षकाचा देखील कोविड सर्व्हे करून घरी परतत असताना अपघाती निधन झाले होते.
डफळापूर स्टँड जवळ मंगळवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. शिंगणापूर नजिकच्या चेक नाक्यावर हा शिक्षक नियंत्रण कर्मचारी म्हणून सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर होता. या घटनेनंतर हणमंत रामचंद्र मुरड (वय ३७,रा.नाथाचीवाडी ता.दौंड जि.पुणे) (ट्रक नं.एम एच १२ एल डी ९७४९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबूले, डिवायएसपी दिलीप जगदाळे, पोलिस निरिक्षक राजाराम शेळके दाखल झाले असून याबाबत अधिकची माहिती घेत आहेत.
धक्कादायक म्हणजे दैनिक लोकशक्तीला मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने चेकपोस्टवर ट्रक न थांबवल्याने शिक्षक कोरे व पोलीस ऑपरेटर चौगुले यांनी त्याचा पाठलाग केला. ट्रक ला गाठून चालकाला खाली उतरण्यास सांगितले असता राग येऊन त्याने शिक्षक कोरे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले. यातून पोलीस ऑपरेटर चौगुले थोडक्यात वाचले आहेत.दरम्यान , महाराष्ट्रात सगळीकडे शिक्षकांना अशी जोखमीची कामे विना प्रशिक्षण देत असल्याने शिक्षकांमध्ये घबराटीचे वातावरण असून त्यांना संरक्षण म्हणून ५० लाखांचा विमा लागू आहे की नाही याबाबत देखील संभ्रम आहे. ही घटना घडल्यानंतर जुनी पेन्शन हक्क संघटनचे सांगली अध्यक्ष अमोल शिंदे यांनी याबाबत तीव्र खेद व्यक्त करत, संघटन सरांच्या कुटुंबासोबत असून त्यांना अनुकंपा व विमा मिळावा यासाठी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .