| मुंबई | कोरोना संसर्गाचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियोजनानुसार २२ जूनपासून प्रारंभ होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
सोमवारी (दि.१८) कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारी रोजी सुरू झाले होते. ते २० मार्चपर्यंत चालणार होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात असावेत आणि प्रशासनावर अतिरिक्त ताण नको म्हणून अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेच १४ मार्च रोजी म्हणजेच एक आठवड्यापूर्वीच अधिवेशन गुंडाळण्यात आले होते.
सभागृह संस्थगित केल्यानंतर झालेल्या घोषणेनुसार २२ जूनपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाणार होते. हे अधिवेशन ३ आठवड्यांचे होणार होते.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात कायम आहे. त्यात ३० जूनपर्यंत देशात श्रमिक व विशेष रेल्वे खेरीज कोणत्याही रेल्वे गाड्या चालवल्या जाणार नाहीत. त्यामुळे विधिमंडळाचे सदस्य अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या बैठकीत अधिवेशनासंदर्भात चर्चा होईल. कोरोनोला अटकाव करण्यासाठी सरकारने मोठा खर्च केला. यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. एकंदरित अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची अधिकची शक्यता निर्माण झाली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा