| नवी मुंबई | कोरोना महामारीच्या काळात सर्वच स्तरातून पंतप्रधान , मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात दानशूर व्यक्ती मदतनिधी जमा करत आहेत. सामाजिक भान जपत आपला खारीचा वाटा अनेक संस्था, व्यक्ती यांच्याकडून शासनापर्यंत पोहचत आहे. अश्याच प्रकारे राज्य प्राथमिक शिक्षक संघ, नवी मुंबई यांच्याकडून नवी मुंबई महानगरपालिकेला कोव्हीड-१९ साठी रूपये तब्बल २,७९,२२१/- किंमतीच्या वैद्यकिय साहित्याची मदत करण्यात आली आहे. सदरच्या साहित्यामध्ये पी.पी.ई. किट-१५०, मास्क-१२५, ब्लँकेट-७४१ याचा समावेश आहे. यासाठी संघटनेने उत्स्फूर्तपणे नवी मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांनी वर्गणी काढून लढा निधी जमा केला होता.
या नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमाबाबत नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, नवी मुंबई यांचे कौतुक केले. याशिवाय कोव्हीड-१९ निमित्त शिक्षकांनी जबाबदारीपूर्ण केलेल्या विविध कामाबद्दल गौरवास्पद उदगार काढले आहेत. मदतनिधी साहित्य महापालिका उपायुक्त श्री नितीन काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी विस्तार अधिकारी श्रीम. रूतिका संखे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नवी मुंबई चे अध्यक्ष श्री सांगरनाथ भंडारी, राज्य चिटणीस श्री संजय मोरे, खजिनदार खुशाल चौधरी तसेच सरचिटणीस आत्माराम आग्रे हे उपस्थित होते.
– सागरनाथ भंडारी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, नवी मुंबई.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
उत्तम काम