| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल २१२७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७१३६ वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात २६,१६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात सर्वाधिक ७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी ४३ जण मुंबई, १५ जण ठाणे तर पुण्यातील ६, अकोला ३, नवी मुंबई, बुलढाणा २, नागपूर, औरंगाबाद, धुळे, नाशिक शहरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत १३२५ जणांचा मृत्यू झाला आहे. आज १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २ लाख ९३ हजार ९९८ नमुन्यांपैकी २ लाख ५६ हजार ८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर ३७१३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ८६ हजार १९२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून २१ हजार १५० जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत ९६३९ कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी ५० पुरुष तर २६ महिला आहेत. त्यातील ३० जण हे ६० वर्षापुढील वयोगटातील आहे. ३९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ७ रुग्ण ४० वर्षाखालील आहे. ७६ रुग्णांपैकी ५८ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.
Maharashtra is doing around 15000 tests (for COVID-19) everyday in 67 testing labs. Death rate in Maharashtra has also come down to 3.2% now: Maharashtra Health Minister Rajesh Tope https://t.co/RS4NzLTPrY
— ANI (@ANI) May 19, 2020
महाराष्ट्रात टेस्टिंग सर्वाधिक
महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे कारण आपण टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर करतो आहोत. दररोज १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. तसंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं आहे ही बाब समाधानाची आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
हीन वागणूक देऊ नका
एखाद्या माणसाला करोनाची लागण झाली म्हणून त्याला हीन वागणूक देऊ नका. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हे मला आज आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. कारण एखाद्याला करोना झाला म्हणजे त्याला हीन वागणूक दिली जाते असे प्रकार समोर आले आहेत. करोनाच काय एखाद्याला होम क्वारंटाइन केलं तरीही त्याला दिली जाणारी वागणूक हीन असते. अशा वागणुकीमुळे त्याचे मनोधैर्य खचू शकते त्यामुळे कुणालाही अशी वागणूक देऊ नका अशी विनंती मी तुम्हाला करतो आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
करोनासोबत जगावं लागेल
करोनासोबत आपल्याला जगावं लागेल. आपण घाबरुन जाण्याचं कारण नाही मात्र अधिक सजग आणि जागरुक राहणं ही आत्ता काळाची गरज आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा