| मुंबई | नवी मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे. देशातल्या सहा स्वच्छ पंचतारांकित शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई शहराला पाईव्ह स्टार रेटींग मिळाले आहे. देशातल्या कचरा मुक्त शहरांना दिल्या जाणाऱ्या ही मानांकनं केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदिपसिंह पुरी यांनी जाहीर केली. त्यामध्ये देशातल्या सहा शहरांना कचरामुक्त शहराचं पंचतारांकित मानांकन दिले आहे.
Very happy to announce the results of Star Rating of Garbage Free Cities.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) May 19, 2020
The Star Rating Protocol was launched in 2018 to institutionalize a mechanism for cities to achieve Garbage Free status & achieve higher degrees of cleanliness. @PMOIndia @PIB_India @SwachhBharatGov pic.twitter.com/jRCLiLRf9b
केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी यांनी सोमवारी जाहीर केलेल्या कचरामुक्त शहरांच्या यादीमध्ये सलग दुसर्या वर्षी नवी मुंबईला पंचतारांकित रेटिंग प्राप्त झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई हे एकमेव शहर आहे. या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबईतल्या नागरिकांचं अभिनंदन केलेे आहे. त्यासोबत इंदूर, म्हैसूर, अंबिकापूर, सूरत आणि राजकोट यांनाही पंचतारांकित रेटिंग देण्यात आले आहे.
काय आहेत मानके:
शहरांना स्वच्छतेचे उच्च पद मिळविण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी २०१८ मध्ये स्टार रेटिंग प्रोटोकॉल सुरु केला. केंद्र सरकारच्या अधिकारी कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेची अचानक तपासणी करतात. नागरिकांशी बोलतात. घनकचरा व्यवस्थापनाच्या दोन वेगवेगळ्या मापदंडांवर अधिकारी प्रत्येक प्रभागावार गुण देण्यात देतात. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता या रेटिंगचे मुख्य घटक म्हणजे नाले व जल संस्था स्वच्छ करणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, आणि बांधकाम व तोडे (डबर) कचरा व्यवस्थापित करणे.
२०२० सर्वेक्षण :
२०२० च्या सर्वेक्षणानुसार सहा शहरांना १ तारखेला १.१ कोटी नागरिकांचे सहाय्य, दहा लाखांहून अधिक भू-टॅग चित्रे आणि ५१७५ घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट देऊन पंचतारांकित रेटिंग, ६५ शहरांना तीन तीनतारांकित रेटिंग आणि ७० शहरांना एक स्टार देण्यात आला आहे.
तीन स्टार, एक स्टार रेटिंग :
६५ शहरांना तीन तारांकित मानांकन मिळाली आहेत. त्यात राज्यातल्या ३४ शहरांचा समावेश आहे. चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, ठाणे आणि मीरा-भाईंदर यासह महाराष्ट्रातील ३४ शहरांना तीन स्टार रेटिंग देण्यात आले असून अहमदनगर, अकोला, नाशिक, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीसह यांना एक स्टार रेटिंग देण्यात आले आहे. १ हजार ४३५ शहरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
ठाणे शहराचे रेटिंग वाढले:
कचरामुक्त शहरांच्या यादीत नवी मुंबईला फाईव्ह स्टॉर रॅकींग मिळाले असतांना ठाणे महापालिकेचा क्रमांकही मागील वेळेपेक्षा सुधारल्याचे दिसून आले आहे. मागील वेळेस टू स्टार असलेल्या ठाणे महापालिकेला यंदा थ्री स्टार रेटींग मिळाले आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये केलेल्या सुधारणेमुळे, तक्रारी सोडविण्यामध्ये आणि कचऱ्याची योग्य रितीने हाताळणी केल्यामुळे पालिकेचा हा क्रमांक सुधारल्याची माहिती आता समोर आली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा