नवी मुंबई फाईव्ह स्टार, ठाणे , मिरा भाईंदर थ्री स्टार तर कल्याण डोंबिवली वन स्टार शहर..!
देशातल्या कचरा मुक्त शहरांना दिली जाणारी मानांकने जाहीर..!

| मुंबई | नवी मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे. देशातल्या सहा स्वच्छ पंचतारांकित शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई शहराला पाईव्ह स्टार रेटींग मिळाले आहे. देशातल्या कचरा मुक्त शहरांना दिल्या जाणाऱ्या ही मानांकनं केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदिपसिंह पुरी यांनी जाहीर केली. त्यामध्ये देशातल्या सहा शहरांना कचरामुक्त शहराचं पंचतारांकित मानांकन दिले आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी यांनी सोमवारी जाहीर केलेल्या कचरामुक्त शहरांच्या यादीमध्ये सलग दुसर्‍या वर्षी नवी मुंबईला पंचतारांकित रेटिंग प्राप्त झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई हे एकमेव शहर आहे. या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबईतल्या नागरिकांचं अभिनंदन केलेे आहे. त्यासोबत इंदूर, म्हैसूर, अंबिकापूर, सूरत आणि राजकोट यांनाही पंचतारांकित रेटिंग देण्यात आले आहे.

काय आहेत मानके:

शहरांना स्वच्छतेचे उच्च पद मिळविण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी २०१८ मध्ये स्टार रेटिंग प्रोटोकॉल सुरु केला. केंद्र सरकारच्या अधिकारी कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेची अचानक तपासणी करतात. नागरिकांशी बोलतात. घनकचरा व्यवस्थापनाच्या दोन वेगवेगळ्या मापदंडांवर अधिकारी प्रत्येक प्रभागावार गुण देण्यात देतात. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता या रेटिंगचे मुख्य घटक म्हणजे नाले व जल संस्था स्वच्छ करणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, आणि बांधकाम व तोडे (डबर) कचरा व्यवस्थापित करणे.

२०२० सर्वेक्षण :

२०२० च्या सर्वेक्षणानुसार सहा शहरांना १ तारखेला १.१ कोटी नागरिकांचे सहाय्य, दहा लाखांहून अधिक भू-टॅग चित्रे आणि ५१७५ घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट देऊन पंचतारांकित रेटिंग, ६५ शहरांना तीन तीनतारांकित रेटिंग आणि ७० शहरांना एक स्टार देण्यात आला आहे.

तीन स्टार, एक स्टार रेटिंग :

६५ शहरांना तीन तारांकित मानांकन मिळाली आहेत. त्यात राज्यातल्या ३४ शहरांचा समावेश आहे. चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, ठाणे आणि मीरा-भाईंदर यासह महाराष्ट्रातील ३४ शहरांना तीन स्टार रेटिंग देण्यात आले असून अहमदनगर, अकोला, नाशिक, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीसह यांना एक स्टार रेटिंग देण्यात आले आहे. १ हजार ४३५ शहरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

ठाणे शहराचे रेटिंग वाढले:

कचरामुक्त शहरांच्या यादीत नवी मुंबईला फाईव्ह स्टॉर रॅकींग मिळाले असतांना ठाणे महापालिकेचा क्रमांकही मागील वेळेपेक्षा सुधारल्याचे दिसून आले आहे. मागील वेळेस टू स्टार असलेल्या ठाणे महापालिकेला यंदा थ्री स्टार रेटींग मिळाले आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये केलेल्या सुधारणेमुळे, तक्रारी सोडविण्यामध्ये आणि कचऱ्याची योग्य रितीने हाताळणी केल्यामुळे पालिकेचा हा क्रमांक सुधारल्याची माहिती आता समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *