| मुंबई | मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यासाठी आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधेतही वाढ करण्यात येत असून प्रत्येकाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यास आम्ही बांधील आहोत, कोरोनाबाधितांसाठी खाटा आणि अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध करण्याबाबत मुंबईतील ३३ मोठ्या रुग्णालयांच्या प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे, असे महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलेे.
पालिका रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल आहेत. आता या खासगी रुग्णालयांमध्ये सरकारने निश्चित केलेल्या दरात उपचार घेणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. खाटा तात्काळ उपलब्ध व्हाव्या यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात डॅशबोर्ड सुविधा सुरू करण्यात आली असून अर्ध्या तासाने रुग्णालयांमधील खाटांबाबतची माहिती मिळत आहे. १९१६ या आपत्कालिन क्रमांकाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असेही चहल यांनी सांगितले.
कोरोना काळजी केंद्रात ३० हजार, डीसीएच-डीसीएचसीमध्ये १४ हजार खाटा, खासगी रुग्णालयात ७५०० खाटा उपलब्ध होतील. त्याशिवाय पालिकेच्या विभागस्तरावर २५०० खाटा, वरळीच्या एनएससीआयमध्ये ६४०, रेसकोर्सवर ३००, वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान व नेस्को येथे ५३५ खाटा उपलब्ध होतील.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री