आम्ही प्रत्येकाला वैद्यकीय सेवा देण्यास बांधील – आयुक्त इक्बालसिंह चहल

| मुंबई | मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यासाठी आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधेतही वाढ करण्यात येत असून प्रत्येकाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यास आम्ही बांधील आहोत, कोरोनाबाधितांसाठी खाटा आणि अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध करण्याबाबत मुंबईतील ३३ मोठ्या रुग्णालयांच्या प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे, असे महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलेे.

पालिका रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल आहेत. आता या खासगी रुग्णालयांमध्ये सरकारने निश्चित केलेल्या दरात उपचार घेणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.  खाटा तात्काळ उपलब्ध व्हाव्या यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात डॅशबोर्ड सुविधा सुरू करण्यात आली असून अर्ध्या तासाने रुग्णालयांमधील खाटांबाबतची माहिती मिळत आहे. १९१६ या आपत्कालिन क्रमांकाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असेही चहल यांनी सांगितले. 

कोरोना काळजी केंद्रात ३० हजार, डीसीएच-डीसीएचसीमध्ये १४ हजार खाटा, खासगी रुग्णालयात ७५०० खाटा उपलब्ध होतील. त्याशिवाय पालिकेच्या विभागस्तरावर २५०० खाटा, वरळीच्या एनएससीआयमध्ये ६४०, रेसकोर्सवर ३००, वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान व नेस्को येथे ५३५ खाटा उपलब्ध होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *