
| मुंबई | कोरोनाचं संकट असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून अजित पवार हे कमालीचे शांत आहेत. ते माध्यमांशीही बोलत नाहीत. मात्र त्यांचं काम सुरूच आहे. कोरोनाशी सरकार लढत असतानाच महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचं मुख्य कारण हे अजित पवारांची अस्वस्थता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार नाराज असणे ही महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
अजित पवार हे कामाच्या झपाट्यासाठी प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला काही पत्रकार परिषदांमधून त्यांनी अनेक निर्णय जाहीर केलेत. मात्र नंतर ते फारसे पुढे आले नाहीत. त्यानंतरच महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. त्यात राष्ट्रवादीचं अंतर्गत राजकारणही हा महत्त्वाचा घटक आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना भाजपच्या तंबूत गेलेल्या अजित पवारांचं मन वळवून त्यांना पुन्हा परत आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचं महत्त्व पूर्वीसारखेच राहिल याचं आश्वासन त्यांना शरद पवारांकडून देण्यात आलं होतं. नंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यातही आलं.
मात्र आता दादांची पक्षावरची पकड पूर्वीसारखी राहिली नाही असं म्हटलं जात आहे. आता सर्व सूत्र ही शरद पवारांनी आपल्या ताब्यात ठेवली आहेत. कोरोनाच्या गंभीर काळात गेल्या दोन महिन्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाल्याचं पुढे आलेलं नाही. आपल्याला डावललं जातंय असं अजित पवारांना वाटत आहे.- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा
दादा आहेत ते सर्वांचे आणि राज्याचे. अगदी सत्ताधारी ते विरोधक. सर्वांशी घरोबा आहे. मोकळेपणाने कारभार करता यावा म्हणून करू शकतात बंड. DADA IS DADA. MEANS DON.