
| मुंबई | कोरोनाचं संकट असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून अजित पवार हे कमालीचे शांत आहेत. ते माध्यमांशीही बोलत नाहीत. मात्र त्यांचं काम सुरूच आहे. कोरोनाशी सरकार लढत असतानाच महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचं मुख्य कारण हे अजित पवारांची अस्वस्थता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार नाराज असणे ही महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
अजित पवार हे कामाच्या झपाट्यासाठी प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला काही पत्रकार परिषदांमधून त्यांनी अनेक निर्णय जाहीर केलेत. मात्र नंतर ते फारसे पुढे आले नाहीत. त्यानंतरच महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. त्यात राष्ट्रवादीचं अंतर्गत राजकारणही हा महत्त्वाचा घटक आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना भाजपच्या तंबूत गेलेल्या अजित पवारांचं मन वळवून त्यांना पुन्हा परत आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचं महत्त्व पूर्वीसारखेच राहिल याचं आश्वासन त्यांना शरद पवारांकडून देण्यात आलं होतं. नंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यातही आलं.
मात्र आता दादांची पक्षावरची पकड पूर्वीसारखी राहिली नाही असं म्हटलं जात आहे. आता सर्व सूत्र ही शरद पवारांनी आपल्या ताब्यात ठेवली आहेत. कोरोनाच्या गंभीर काळात गेल्या दोन महिन्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाल्याचं पुढे आलेलं नाही. आपल्याला डावललं जातंय असं अजित पवारांना वाटत आहे.- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..
दादा आहेत ते सर्वांचे आणि राज्याचे. अगदी सत्ताधारी ते विरोधक. सर्वांशी घरोबा आहे. मोकळेपणाने कारभार करता यावा म्हणून करू शकतात बंड. DADA IS DADA. MEANS DON.