| मुंबई | राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने ८ जूनपासून परवानगी दिली आहे. राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार १० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालये सुरू करता येतील.
लॉकडाऊन 5.0 ची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्याची घोषणा केली होती. त्याला अनलॉक 1.0 असे नाव देण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारकडून आज लॉकडाऊनमधील ६ अटी शिथिल करण्यात आल्या.(Lockdown new rules)
- १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचाऱ्यांमध्ये खासगी कार्यालये सुरू करता येतील.
- सम-विषम नियमानुसार दुकाने उघडता येतील. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात यावे.
- उद्याने, तसेच उद्यानात व्यायाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी उद्यानातील जीम वापरता येणार नाही.
- शैक्षणिक संस्थांचे कामकाज सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन तसेच निकाल जाहीर करता येतील.
- मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यास आता पासची गरज नसेल.
- ७ जूनपासून वृत्तपत्रांची छापाई आणि वितरण सुरू होईल. त्यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे बंधनकारक असणार आहे.(Lockdown new rules)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .