वाचा : आजपासून या अटी शिथिल..!

| मुंबई | राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने ८ जूनपासून परवानगी दिली आहे. राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार १० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालये सुरू करता येतील.

लॉकडाऊन 5.0 ची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्याची घोषणा केली होती. त्याला अनलॉक 1.0 असे नाव देण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारकडून आज लॉकडाऊनमधील ६ अटी शिथिल करण्यात आल्या.(Lockdown new rules)

  • १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचाऱ्यांमध्ये खासगी कार्यालये सुरू करता येतील.
  • सम-विषम नियमानुसार दुकाने उघडता येतील. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात यावे.
  • उद्याने, तसेच उद्यानात व्यायाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी उद्यानातील जीम वापरता येणार नाही.
  • शैक्षणिक संस्थांचे कामकाज सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन तसेच निकाल जाहीर करता येतील.
  • मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यास आता पासची गरज नसेल.
  • ७ जूनपासून वृत्तपत्रांची छापाई आणि वितरण सुरू होईल. त्यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे बंधनकारक असणार आहे.(Lockdown new rules)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *