| मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरीच्या वारीच्यानिमित्ताने भेदभावाचे राजकारण करु पाहत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरीला पायी जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक वारकरी संस्थांना प्रातिनिधिक स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये विदर्भातील एकाही वारकरी संस्थेचा समावेश नाही. हा विदर्भातील वारकऱ्यांशी दुजाभाव आहे. या वारकऱ्यांवर अन्याय झाला आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.(Ambedkar on ajit pawar and wari)
वारकऱ्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजाभाव केलाय. आषाढी एकादशी निमित्त विदर्भातील एकाही वारकरी मंडळींना परवानगी देण्यात आली नाहीये. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे.@OfficeofUT @AjitPawarSpeaks pic.twitter.com/qxcLDdpWRT
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 8, 2020
राज्यातील लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पालख्याना यंदा परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्या मधील वारकरी प्रतिनिधींची एक बैठक घेऊन यातील पाच प्रतिनिधींना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली. (Ambedkar on ajit pawar and wari)
मात्र, विदर्भातील एकाही वारकरी प्रतिनिधीला पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात न आल्याने हा त्यांच्यावर अन्याय आहे. विदर्भ हीदेखील संतांची भूमी आहे. अनेक वारकरी विदर्भातुन चालत पंढरपूरला येतात. शासनाने दिलेला निर्णय मान्य असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी पुण्यातील वारकरी प्रतिनिधींना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तशीच परवानगी विदर्भातील वारकरी प्रतिनिधींना देण्यात यावी, अशी मागणी या वारकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला विदर्भातील एकाही वारकरी संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावले नव्हते. यात मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी यामध्ये लक्ष घालावे आणि विदर्भ आणि बिगरविदर्भ अशी जी विभागणी झाली आहे, त्याकडे लक्ष द्यावे. तसेच विदर्भातील तीन ते चार वारकरी संस्थांना पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.(Ambedkar on ajit pawar and wari)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .