| ठाणे | कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाण्यामध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. यावेळी लॉकडाऊन एकचे सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१ जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल. २ ते ११ जुलैपर्यंत हा लॉकडाऊन कडक असणार आहे. भाजी तसेच मासळी बाजारदेखील या काळात बंद असतील. मुंबईला ये-जा देखील करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. याआधी उल्हानसगर आणि भिवंडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर नवी मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण ठाण्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाण्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु होती. प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. पण अखेर आज पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर लॉकडाऊनचा अधिकृत आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान निर्बंध थिथील झाल्याने लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून ठाणे पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी लोकांना नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणा-या ठाणे, कल्याण-डोंबवली, भिवंडी, उल्हासनगर या चार महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात राहणे अपेक्षित आहे. गरजेच्या गोष्टी, कामांसाठी खासगी कार, टॅक्सी, रिक्षा ज्यामध्ये एक अधिक अशा दोघांना आणि दुचाकीवर एकालाच परवानगी आहे. असे असतानाही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. कंटेनमेंट झोन, रेड झोन वाढत आहेत, असे अमित काळे यांनी सांगितले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .