| नवी दिल्ली | संसदेने बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयके मंजूर केली. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढता येणार आहे. ‘द इंडस्ट्रियल रिलेशन्स कोडबिल २०२०’, ‘द कोड ऑन सोशल सिक्युरिटी, २०२०’ आणि ‘द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अॅड वर्किंग कंडिशन्स कोड, २०२०’ या विधेयकांचा समावेश आहे.
आठ खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना राज्यसभेने आवाजी मताने औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यवसाय सुरक्षेशी संबंधित तीन कामगार विधेयकांना मंजुरी दिली.
कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की बदलत्या व्यावसायिक वातावरणाला योग्य अशी पारदर्शक प्रणाली तयार करणे, हा या कामगार सुधारणांचा हेतू आहे. रोजगार निर्मितीसाठी कर्मचारी मर्यादा १०० ठेवणे उचित नाही. ही मर्यादा वाढविण्यात आल्याने रोजगारनिर्मिती होईल आणि नोकरभरतीला चालना मिळेल. या विधेयकांमुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी राज्य महामंडळाच्या व्याप्ती वाढवून कर्मचाऱ्यांचे सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा मिळेल.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .