| इंदापूर/ महादेव बंडगर | बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, झालेल्या प्रचंड वादळी पावसात, मध्य महाराष्ट्रासह, सगळीकडेच जबरदस्त तडाखा बसला आहे. यात आपल्या इंदापूर तालूक्यातील नागरिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मा. बांधकाम व आरोग्य सभापती तथा, पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी काल नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
यात लोणी देवकर गावातील, परिस्थितीचा अंदाज घेत असता,
लोकांच्या घरातून पाणी शिरल्याने, घराचे, घरातील जीवनावश्यक वस्तूंचे तसेच साठवण्यात आलेल्या धान्याचेही नुकसान झाले आहे. याचसह गावातील दुकांनातून पाणी शिरून व्यापाऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनामुळे सगळीच आर्थिक गणितं बघिडली असता, त्याच्या पाठोपाठ झालेल्या या नुकसानामुळे सामान्य नागरिक चिंतातूर झाला आहे.
बिजवडी, गागरगाव, लोंढेवस्ती या भागातून पाहणी केली असता, शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे माने यांनी सांगत, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्वरित पंचनामे करण्यासाठीच्या सूचना यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
न्हावी गावातूनही पावसाचा तडाखा बसला असल्याने, येथे करण्यात आलेल्या पाहणी दरम्यान हाता तोंडाशी आलेला पिकाचा घास वाहून गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच तसेच रुई, तळेवस्ती, लावंडवस्ती, मराडेवाडी या भागाची पाहणी केली असता. सर्वांचे घरदार, शेतशिवारं यांचे मोठे नुकसान झाले असून सरकार दरबारी आपल्याला योग्य तो न्याय मिळून, पुन्हा उभारी घेण्यासाठी पाठबळ मिळावे हीच सर्वांची अपेक्षा आहे. हि मदत लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत मी सर्व इंदापूरकर नागरिकांच्या वतीने पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी माने यांनी सांगितले.
पुढच्या टप्प्यात तालुक्यातील पळसदेव याठिकाणी भेट दिली. पावसाच्या प्रकोपाने पळसदेव येथील तलाव फुटला असून बरेच पाणी वाहून गेले.पळसदेव तलावाचा विचार करता, याची साठवण क्षमता बरीच मोठी असून, तलावही बराच जुना आहे. या भागातील बरीच गावे व वस्त्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी या तलावातील पाण्यावरच अवलंबून असतात.
पावसाने झालेल्या नुकसानामुळे पळसदेव, रुई, मराडेवाडी या गावांवर पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे. याचसह या भागातील लाईटचे खांब, डीपी, तारा सारे काही वाहून गेले असताना, महावितरण कर्मचारी करत असलेल्या कामाची यावेळी माने यांनी पाहणी केली.
याचसह भावडी येथेही परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला. येथेही शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले असून या अस्मानी संकटाच्या विरोधातही आपल्या माणसांसाठी कायमच कटिबद्ध असल्याचे प्रविण माने यांनी प्रतिपादन केले.
या पाहाणी दौऱ्याच्या निमित्ताने पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, बिजवडी गावचे सरपंच दादाराम काळेल, न्हावी गावचे सरपंच बळीभाऊ बोराटे, पळसदेव ग्रामपंचायत सदस्य मेघराज कुचेकर,पळसदेव ग्रामपंचायत सदस्य सुजित मोरे, संपत काळे,यशवंत कचरे, पद्माकर लावंड, अंकुश लावंड, पांडुरंग डोंबाळे, दिलीप मारकड, शहाजी बनसुडे, प्रकाश रासकर, मधुकर घाडगे, सतिश मारकड, अनंता करगळ, तुषार भोसले, दीपक सातव, अजिनाथ कचरे, वामन वीर,सचिन सूर्यवंशी, रविंद्र देशमुख, अशोक मदने, देवराव सूर्यवंशी, बापू साळवे, विजय ढुके, कैलास तोंडे, अभिजित देवकर, गणेश ढुके, प्रविण यादव, प्रितम सूर्यवंशी, किरण शिंदे, अंकुश नरळे, पिनू मिंड, अमोल मराडे, गणेश मराडे, अंबादास मराडे, दत्तात्रय मराडे, प्रदीप मराडे, तलाठी शेदयाळ भाऊसाहेब, ग्रामसेवक बनसुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .