- दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : शनिवार, १८ एप्रिल
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील COVID-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यवाहीस सुरुवात केली आहे . या कामाची प्रभावी अंमलबजावणी सर्वच प्रभागातील आरोग्य केंद्रांकडून केली जात आहे . ज्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत तो भाग ( High risk zone) संपूर्ण रित्या सील करून , त्या ठिकाणाच्या सभोवतालच्या परिसरातील ( Low risk zone ) घरोघरी सर्वेक्षण करून सतत पंधरा दिवस प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे . जेणेकरून कोणताही नवीन रुग्ण प्राथमिक टप्प्यावर ओळखून त्याच्यावर योग्य ते उपचार करता येतील आणि त्याच्या पासून होणाऱ्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवता येईल .
आरोग्य विभागाच्या या अत्यंत महत्त्वाच्या योजनेसाठी महापालिका प्रशासनाने महानगरपालिका शाळांतील शिक्षकांच्या नेमणुका पालिका क्षेत्रातील सर्वच प्रभागातील आरोग्य केंद्रात केल्या आहेत . कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देणाऱ्या आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स , नर्सेस आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीला शिक्षक बंधुभगिनी गेल्या तीन आठवड्यांपासून कार्यरत झालेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भयभीत असलेल्या सामान्य जनतेच्या सेवेसाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत शिक्षक या जागतिक आपत्तीच्या काळात आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावीत आहेत. ठाणे महापालिका प्रशासनाने शिक्षकांवर टाकलेली जबाबदारी मोठया धैर्याने पार पाडत आरोग्य विभागास मदतीचा हात देत आहेत.
आमचे शिक्षक या कठीण प्रसंगात देखील खंबीरपणे प्रशासनासोबत काम करत आहेत. प्रत्येक राष्ट्रीय कर्तव्यात शिक्षक खंबीरपणे कार्य करत असतात, याचा आम्हाला अभिमान आहे.
– फापाळे सर ( महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, ठाणे जिल्हा)
खुप छान काम करत आहेत
सर्व बंधुभगिनींचे हार्दिक अभिनंदन
स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असलेल्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींना मनाचा मुजरा.
Atyant mahtvache Paul
Swath cha jiv dhokyat takun Thanya che savrakshan
खूप छान काम करत आहेत. अभिमान वाटतो
Service to man is service to God.
good work
सर्वात छान काम करत आहे .
आम्हास आपला अभिमान वाटतों .
Apni jaan ki parwah na karte huye sabhi teachers man laga kar kaam kar rahe hai Allah sabhi teachers ki hifazat far
Great work, Proud of you all. Stay safe
खूप चागलं कामं करता आहात तुम्ही सगळे, पण हे करत असताना स्वतः ची सुद्धा काळजी घ्या. मला तुमचा सगळ्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
आम्हाला आपला अभिमान वाटतो.
Khup chhan kam ahe