| नवी दिल्ली | तुम्ही एखाद्या गावी जाण्यासाठी बसचा पर्याय नेहमी निवडता. बसने आपल्या राज्यात सहजगत्या प्रवास करू शकता. फार तर परराज्यात एखादवेळी बसचा पर्याय निवडला जातो. मात्र, तुम्हाला जर कोणी परदेशाचा प्रवास बसने करायला सांगितलं तर? होय, आता चक्क सिंगापूरला आपल्या भारतातून बसने प्रवास करता येणार आहे! हरियाणातून नुकतीच ही बस सेवा सुरू झाली आहे. जाणून घेऊया, या अनोख्या प्रवासाबद्दल.
हरियाणामधील गुरुग्राम कंपनीने नुकतीच ‘इंडिया टू सिंगापूर’ साठी बससेवा सुरू केल्याचे जाहीर केले आहे. ही बस तीन देशांतून जाईल. आपण फक्त या बस प्रवासातल्या आनंदाचा अंदाज लावू शकता.
मणिपूरच्या इम्फाल येथून सुरू होणाऱ्या या बससेवेचे तिकीट बुक करण्यासाठी अॅडव्हेंचर ओव्हरलँड नावाची कंपनी लोकांना आमंत्रित करीत आहे. पहिल्यांदाच सुरू झालेल्या या अनोख्या प्रवासात ही बस म्यानमार, थायलंड आणि मलेशियामार्गे सिंगापूरकडे जाणार आहे. 14 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 या दिवसात ही बस भारत ते सिंगापूरपर्यंतचा आपला प्रवास पूर्ण करणार आहे
या प्रवासामध्ये म्यानमारमधील काले आणि यांगून, थायलंडमधील बँकॉक आणि क्राबी आणि क्वालालंपूर यासह अनेक महत्त्वपूर्ण शहरांमधून ही बस जाईल. या प्रवासात केवळ 20 प्रवासी भारत ते सिंगापूर आणि सिंगापूर ते भारत प्रवास करू शकतील. कंपनीने म्हटले आहे की प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्वावर बुकिंग स्वीकारले जाईल आणि या प्रवासासाठी फक्त २० जागा आरक्षित आहेत. एकेरी प्रवास पूर्ण करण्यासाठी बसला सुमारे २० दिवस लागतील.
यापूर्वी अॅडव्हेंचर ओव्हरलँडने दिल्ली ते लंडन या बससेवेची योजना जाहीर केली होती आणि जगातील सर्वात प्रदीर्घ रोड ट्रिप म्हणून वर्णन केले होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .