काय सांगता.. आता भारतातून बस ने जाता येणार सिंगापूर ला…!

| नवी दिल्ली | तुम्ही एखाद्या गावी जाण्यासाठी बसचा पर्याय नेहमी निवडता. बसने आपल्या राज्यात सहजगत्या प्रवास करू शकता. फार तर परराज्यात एखादवेळी बसचा पर्याय निवडला जातो. मात्र, तुम्हाला जर कोणी परदेशाचा प्रवास बसने करायला सांगितलं तर? होय, आता चक्क सिंगापूरला आपल्या भारतातून बसने प्रवास करता येणार आहे! हरियाणातून नुकतीच ही बस सेवा सुरू झाली आहे. जाणून घेऊया, या अनोख्या प्रवासाबद्दल.

हरियाणामधील गुरुग्राम कंपनीने नुकतीच ‘इंडिया टू सिंगापूर’ साठी बससेवा सुरू केल्याचे जाहीर केले आहे. ही बस तीन देशांतून जाईल. आपण फक्त या बस प्रवासातल्या आनंदाचा अंदाज लावू शकता.

मणिपूरच्या इम्फाल येथून सुरू होणाऱ्या या बससेवेचे तिकीट बुक करण्यासाठी अ‍ॅडव्हेंचर ओव्हरलँड नावाची कंपनी लोकांना आमंत्रित करीत आहे. पहिल्यांदाच सुरू झालेल्या या अनोख्या प्रवासात ही बस म्यानमार, थायलंड आणि मलेशियामार्गे सिंगापूरकडे जाणार आहे. 14 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 या दिवसात ही बस भारत ते सिंगापूरपर्यंतचा आपला प्रवास पूर्ण करणार आहे

या प्रवासामध्ये म्यानमारमधील काले आणि यांगून, थायलंडमधील बँकॉक आणि क्राबी आणि क्वालालंपूर यासह अनेक महत्त्वपूर्ण शहरांमधून ही बस जाईल. या प्रवासात केवळ 20 प्रवासी भारत ते सिंगापूर आणि सिंगापूर ते भारत प्रवास करू शकतील. कंपनीने म्हटले आहे की प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्वावर बुकिंग स्वीकारले जाईल आणि या प्रवासासाठी फक्त २० जागा आरक्षित आहेत. एकेरी प्रवास पूर्ण करण्यासाठी बसला सुमारे २० दिवस लागतील.

यापूर्वी अ‍ॅडव्हेंचर ओव्हरलँडने दिल्ली ते लंडन या बससेवेची योजना जाहीर केली होती आणि जगातील सर्वात प्रदीर्घ रोड ट्रिप म्हणून वर्णन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *