ही माहिती वाचून तुम्ही नक्कीच प्राथमिक शिक्षकांना सलाम कराल..!



| मुंबई : प्राजक्त झावरे पाटील |  सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून निर्माण झालेल्या संकटामूळे संबंध जगभरात हाहाकार उडाला आहे. आपल्या भारत देशात देखील दररोज नव्याने यात भर पडत आहे. महाराष्ट्रात देखील प्रामुख्याने मुंबई , पुणे महानगर पट्टा याने सर्वाधिक बाधीत आहे. या संकटाविरोधात डॉक्टर, आरोग्य सेवा पुरविणारे कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी देवदूत बनवून आपला या विषाणू पासून बचाव करत आहेत. या सर्वांना आपल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देवदूतच संबोधले आहे. या देवदूतांसोबत अजुन एक घटक प्रत्यक्ष फिल्डवर या विषाणू विरूद्ध लढत आहे तो म्हणजे शिक्षक..! प्राथमिक शिक्षक..!

प्रत्यक्ष निवडणुका, जनगणना, आपत्ती व्यवस्थापन असो की सरकारची कोणतीही महत्वाची योजना राबवायची असेल किंवा राज्यातील शेवटच्या नागरिकांपर्यंत काही पोहचवायचे असेल तर हाच शिक्षक वेळोवेळी धावून आला आहे. आता या कोरोनाच्या लढाईत सुद्धा हा शिक्षक असाच खंबीर उभा आहे.

बघा आता देखील प्रत्यक्ष फिल्डवर काय करतायेत शिक्षक ..

१. मुंबई मनपा – हॉटस्पॉट क्षेत्रासहित प्रत्येक चाळ, वस्ती , इमारतीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण , तसेच ज्या शाळा क्वारांटाईन करण्याकरिता वापरल्या जाणार आहेत त्याचे प्रशासन..
२. ठाणे मनपा – ठाण्यातील प्रत्येक इमारत, चाळ, झोपडपट्टी मधील नागरिकांचा सर्व्हे.. गेली ३० दिवस हा सर्व्हे सुरू आहे. कोणत्याही सुट्टी शिवाय..! यात अधिकतर महिला शिक्षिका असून बऱ्याच ५० वर्षावरील…
३. मीरा भाईंदर मनपा , कल्याण डोंबिवली मनपा – गेली ३० दिवस घरोघरी जाऊन सर्वेक्षण
४. नवी मुंबई – सर्वेक्षण / निवारा केंद्रावर काम
५. भिवंडी मनपा – कम्युनिटी किचन मध्ये जेवणाचे नियोजन – वाटप / सकाळ – संध्याकाळ
६. पनवेल मनपा / उल्हासनगर मनपा – सर्वेक्षण सर्वांना
७. ठाणे जिल्हा – पुरुष शिक्षकांना सर्वेक्षण
८. रायगड जिल्हा – क्वारांटाईन कक्षावर लक्ष / सर्वेक्षण
९. रत्नागिरी – पोलीस मित्र / आरोग्य मित्र / सर्वेक्षण
१०. पालघर – काही तालुक्यांत सर्वेक्षण
११. कोल्हापूर – ४५ वर्षाखालील शिक्षकांना सर्वेक्षण
१२. सातारा – सर्वेक्षण / नाकाबंदी / रेशन दुकान नियंत्रक
१३. पुणे मनपा – गेली ३० दिवस घरोघरी सर्वेक्षण, रेशन वाटप नियंत्रक, PPE वाटप वितरक नोंदणी, गेली ३० दिवस कोणतीही सुट्टी नाही,
१४. पिपंरी चिंचवड – प्रत्येकाला १४ दिवस सर्वेक्षण तसेच क्विक रिस्पॉन्स टीम मध्ये शिफ्ट नुसार काम
१५. पुणे जिल्हा – नाकाबंदी ( शिफ्ट नुसार) / सर्वेक्षण / पेट्रोल पंप निरीक्षक / quarantine साठी नोडल अधिकारी
१६. नाशिक – चेक पोस्ट / quarantine केलेल्या लोकांवर लक्ष / सर्वेक्षण / रेशन दुकानावर नियंत्रक
१७. धुळे – सर्वेक्षण / नाकाबंदी ( शिफ्टनुसार)
१८. जळगाव – काही तालुक्यांमध्ये नाकाबंदी
१९. अहमदनगर – गावचे पालक अधिकारी / चेकपोस्ट नाकाबंदी ( तीन शिफ्ट) / रेशन दुकान धान्य वाटप
२०. औरंगाबाद मनपा – महिला सर्वेक्षण तर पुरुष quarantine adminstration
२१. औरंगाबाद – चेक पोस्ट वर नाकाबंदी ( तीन शिफ्ट ) तसेच रेशन दुकान नियंत्रक
२२. अमरावती मनपा/ जिल्हा – सर्वेक्षण
२३. उस्मानाबाद – पुरुषांना चेकपोस्ट तथा कोरोना सहायता कक्ष
२४. नागपूर – सर्वेक्षण / रेशन दुकानावर नियंत्रक
२५. सोलापूर मनपा – सर्वेक्षण
२६. बीड – चेकपोस्ट ( तीन शिफ्ट मध्ये)/ महिला – सर्वेक्षण
२७. वाशीम – चेकपोस्ट / रेशन दुकान नियंत्रक
२८. मालेगाव – सर्वेक्षण
२९. नंदुरबार – रेशन दुकान नियंत्रक
३०. वर्धा – काही भागात सर्वेक्षण

एकंदरीत, दुसरे कोणतेच सरकारी कर्मचारी शक्यतो आपले काम सोडून दुसरे काम घेत नाहीत..! परंतु शिक्षक प्रत्येक ठिकाणी तितकंच प्रामाणिकपणे काम करत असतात..! त्यामुळे जिथे कमतरता तिथे शिक्षक हे समीकरण अजूनही टिकून आहे. म्हणून या अजुन एका कोरोना सैनिकाला आपण सारे मानाचा सलाम करूया..!



71 Comments

    1. कोणतेही कार्य करायला प्राथमिक शिक्षक नेहमी तयारच असतो. सलाम गुरुवर्य

      1. प्राथमिक शिक्षकांना मानाचा मुजरा……

  1. खरंच मानाचा मुजरा …. 🙏🙏🙏

  2. ठामपा मध्ये माध्यमिक शिक्षक सुध्धा सर्वेच काम करत आहेत

    1. कोणतेही काम असोप्राथमिक शिक्षकच कधीही नाही म्हणत नाही सर्वगुण संपन्न असणारा विदयार्थीप्रिय,समाजप्रिय, राष्टसेवा करतात सर्व सुविधा संरक्षण मिळावे

    2. सलाम सर्व गुरुवर्याना

  3. कोणतेही काम असो ,शिक्षक कधीही नाही म्हणत नाही. विद्यार्थी सेवा, समाज सेवा, राष्ट्र सेवा सर्वच कामे सेवाभावी व्रुतीने करत असतात. त्यांच्या विषयीही सर्वानी आत्मियता दाखवणे आवश्यक आहे.

  4. सर्व कोरोना विरूद्ध च्या युद्धात लढणारे शिक्षक बंधू भगिनी यांना मानाचा मुजरा.

  5. अलीकडे शिक्षक यांना सन्मानाने वागवले पाहिजे.
    शिक्षक हा शासनाने सांगीतलेल्या कोणत्याही
    कामात मागे नसतो.त्याला फक्त सेवा, सुविधा व संरक्षण मिळावे.तसेच तो कुठल्याही परिस्थितीत
    अपमानित होऊ नये.
    जेथे शिक्षकांचा सन्मान,त्याच राष्ट्राचा खरा
    विकास होतो.

    1. देश अडचणीत आहे, राज्य अडचणीत आहे आमचा शेतकरी अडचणीत आहे तेव्हा शिक्षक आज नक्कीच कोरोना योद्धये होऊन धावून येत आहेत . अशा शिक्षकांचा अभिमान वाटतो.
      Proud to be a Teacher

  6. khup chan kontihi apeksha n karata as rashtriy kary kartyat tyanchya ya karyala salam

  7. खरच वाखाणण्याजोगे महान कार्य आहे प्राथमिक शिक्षकांचे……प्रणाम त्या सर्व कोरोना लढाईत लडणाऱ्या तमाम शिक्षक वॄंदाना…. जय गुरु…..

    1. खरंच शिक्षकांचे प्रत्येक काम सुव्यस्थित आणि चोख असते …..💐
      मानाचा मुजरा ….😢

  8. अतिशय उत्तम कामगिरी शेवटी विश्वास

  9. शिक्षकांनी सर्व विभागाची कामे केली पण शिक्षकांची कामे करण्यास कोणीही तयार होत
    नाहीत.कारण यात मलिदा मिळत नाही.म्हणूनच
    तो दीन,हीन समजला जातो व त्याच्या बोलण्याला
    काही अर्थ उरत नाही.आणि म्हणून भ्रष्ट लोकांकडून त्याला अपमानित केले जाते.ज्या
    गुरूंनी त्याला घडविले त्या गुरूंची कदर नाही.
    म्हणून कोणी तरी बोलून गेले आहे की ज्या
    देशात शिक्षकांची कदर,इज्जत नाही.तो देश
    सुसंस्कृत असूच शकत नाही.

  10. जिथे आजार गंभीर , तिथे शिक्षकच खंभीर .

  11. सरकारी प्राथमिक शिक्षक महत्वाची सर्व कामे प्रामाणिकपणे करतात.त्यांचा मान ,आदर समाजाने राखला पाहिजे.

  12. अंतःकरणपूर्वक सलाम सर्व ह्या सैनिकांना

    1. जालना जिल्ह्यातही सर्वेक्षण आणि स्वस्त धान्य दुकानात शिक्षक कर्तव्यावर होते.बातमी वाचुन आनंद झाला.

  13. सलाम शिक्षकांच्या कार्याला 🙏🙏👍👍

  14. आजपर्यंत आपले शिक्षक कधीही कोणतेही काम आले तरी समाजाच्या पर्यायाने देशाच्या हितासाठी काम करत आहे.आज पूर्ण महाराष्ट्रातून सर्व शिक्षक आरोग्य सैनिक म्हणून काम पाहत आहेत त्यामुळे या सेवेसाठी सर्व शिक्षकांना सलाम आज ही बातमी देणाऱ्या आदरणीय प्राजक्तभाई झावरे पाटील आपणांस ही बातमी दिल्यामुळेसलाम आहे

  15. तरीही शिक्षकांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत काही धृतराष्ट्रांटांची मजल जाते. जे स्वतःला मराठी उद्योजकांचे प्रेरणास्थान मानतात आणि समाजातील अनेकांचे त्यांना समर्थन लाभते.

      1. सलाम शिक्षकाचे कामगिरीला

    1. सलाम आपल्या कर्तुत्ववान बांधवांना

  16. काही ठिकाणी योग्य प्रकारे संरक्षण किट दिली जात नाही. वाहतूक व्यवस्था नाही. आयडी नाही. उदा. कल्याण डोंबिवली क्षेत्रात काम करणाऱ्या अंबरनाच्या शिक्षकांना अनेक असमस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

  17. नेहमी राष्ट्रीय कामात अग्रेसर पण प्रसिध्दी पासून दूर

  18. “Teacher is not only to teach,but he is the builder of the Nation.’उगच म्हणत नाहीत….. Salute to All Teachers…

  19. 🙏🙏परंतु काही ठिकाणी योग्य प्रकारे संरक्षण किट, आयडी, वाहतूक व्यवस्था दिली जात नाही, आशाही परिस्थिती शिक्षक काम करत आहेत. शिक्षकांची माफक अपेक्षा असते याची पूर्तता व्हावी. उदा. कल्याणडोंबिवली क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील शिक्षकाची. 🙏🙏

    1. *डिजिटल युग व मानवी यंत्रणा*
      फ़ोन केला की कोरोना वायरस माहितीची जाहिरात लागते. ती पण संपता संपत नाही. त्या जहिरातीतच विचाराव ना कोणाला सर्दी, ताप, खोकला असेल तर अमुक अमुक बटण दाबा. लोकेशन ही मिळेल. Online सर्व्हे ही होऊन जाईल आपोआपच. 90℅ लोकांकडे मोबाईल आहेतच. दोन चार दिवसात संपूर्ण देशाचे सर्वेक्षण होऊन जाईल .

  20. प्राथमिक शिक्षक एकच नंबर ग्रेटआहेत

  21. सलाम ..…जिथे कमी तिथे आम्ही.
    तरीही शिक्षकांच्या पेंशन बाबत अजूनही निर्णय होत नाही ही खेदाची गोष्ट आहे

  22. आनंद सोनकांबळे,अंबरनाथ तालुकाध्यक्ष-कास्ट्राईब संघटना says:

    महीला ,५०वर्षावरील,गंभिर जार यांना वगळावे….या सर्व्हेक्षणात प्रशासन कोणतीच सुरक्षितता पूरवित नाही.त्यामूळे हे काम शिक्षक बंधू भगिनींच्या जीवावर बेतेल तेव्हा जबाबदार कोणाला धरायचे…उदा.महीला भगिनींना छोट्या ओमनी गाडीत कोंबून सर्वे स्पाॕटवर नेले.संख्या होती १३ महीला.

  23. शिक्षक हा नेहमीच कोणत्याही संकटाच्या वेळी असो राष्ट्रीय आणीबाणी असो आता कोरोनासारखे महाभयंकर आपत्ती असो कधीही हयगय करत नाही…शासनास कधीही साथ देण्यास तत्पर असतो.

  24. सर जी अकोला मध्ये सुध्धा शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वस्तधान्य निरीक्षक म्हणून आदेश प्राप्त आहेत. अकोला जिल्ह्यात सुद्धा शिक्षक या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभागी आहेत.

  25. “प्राथमिक शिक्षक हेच खरे देशाचे आधारस्तंभ आहेत.”

  26. राष्ट्र प्रथम या भावनेतुन सर्व शिक्षक सतत करत असतात.कोरोनाला आणि देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला हरवू. हिंद !!!

  27. अतिशय सुंदर काम—-Great Work वंदन सर

  28. कोणत्याही राष्ट्रीय कामात शिक्षक अग्रेसर होता आणि भविष्यात देखील राहील. Great job.

  29. सर्व शिक्षकांच्या कार्याला कोटी कोटी सलाम

  30. सलाम सर्व गुरुवर्याना

  31. मिनाक्षि ठोंबरे प्राथ.शिक्षक भुसावळ जि.प.जळगाव says:

    सर्व प्राथमिक शिक्षकांच्या कार्याला सलाम.

  32. पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात पण,माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजुन तरी सुरु झालेली नाही.म्हणून देशसेवा माणुसकी जपा.आनंदात काय परकेसुद्धा सामील होतातपण, न बोलवता न थकता दु:खात जे सामील होतात तेच या देशाचे खरे सैनिक असतात. जसे या देशातील शिक्षक.

  33. खरच 👍👌
    🚩जिथे कमी तिथे आम्ही🚩

  34. *डिजिटल युग व मानवी यंत्रणा*
    फ़ोन केला की कोरोना वायरस माहितीची जाहिरात लागते. ती पण संपता संपत नाही. त्या जहिरातीतच विचाराव ना कोणाला सर्दी, ताप, खोकला असेल तर अमुक अमुक बटण दाबा. लोकेशन ही मिळेल. Online सर्व्हे ही होऊन जाईल आपोआपच. 90℅ लोकांकडे मोबाईल आहेतच. दोन चार दिवसात संपूर्ण देशाचे सर्वेक्षण होऊन जाईल .

  35. फ़ोन केला की कोरोना वायरस माहितीची जाहिरात लागते. ती पण संपता संपत नाही. त्या जहिरातीतच विचाराव ना कोणाला सर्दी, ताप, खोकला असेल तर अमुक अमुक बटण दाबा. लोकेशन ही मिळेल. Online सर्व्हे ही होऊन जाईल आपोआपच. 90℅ लोकांकडे मोबाईल आहेतच. दोन चार दिवसात संपूर्ण देशाचे सर्वेक्षण होऊन जाईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *