| मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बरीच कुटुंबे मुंबई, पुण्यातून सध्या आपल्या गावी जात आहेत. राज्य शासनाने देखील परराज्यातील मजूर/जनता यांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी नियोजन करून त्यांना त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. परंतु कर्तव्यावर असणारी शासकीय कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे मात्र मुंबईत अडकून पडली आहेत, तसेच बरेच कर्मचारी आपल्या गावी देखील अडकले असून त्यांना कर्तव्यावर हजर व्हायचे आहे. या सर्वांना विना ई पास आंतर जिल्हा प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारकडे केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी सांगितले की, आपल्याच राज्यातील कर्मचारी गावी अडकलेले असताना त्यांना मुंबईत आणण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध करून देण्याबाबत प्रभावी उपाय योजना करण्यात आलेली नाही याकडे आम्ही लक्ष वेधू इच्छितो. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील शासकीय कार्यालयात कार्यरत अनेक कर्मचारी हे आपल्या मुळ गावी अन्य जिल्ह्यांत अडकून पडले आहेत, असे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचेसाठी सध्याच्या आंतरजिल्हा प्रवासाची कार्यपद्धतीत सुधारणा करून राज्य शासकीय कर्मचा-यांनी कार्यालयीन ओळखपत्र दाखविल्यास ई पास ची मागणी न करता प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी.
याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांनी दै. लोकशक्ती शी बोलताना सांगितले की, अशी सोय केल्याने कोरोना विरोधातील या लढ्यात अधिक कर्मचारी सहभागी होतील. तरी वरील प्रस्तावाचा शासनाने ताडडीने विचार करणे आवश्यक आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा