..आणि विराट रात्रभर रडत होता.


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल

| मुंबई |सध्या करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत.

भारतातील आघाडीची टी २० लीग IPL चे आयोजनदेखील लांबणीवर ढकलण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सर्व क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद आहेत. विराटनेदेखील नुकताच या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्याने एक आठवणही सांगितली.

मैदानावर विराट कायम आपल्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करताना दिसतो, पण नुकतेच त्याने एक अशी गोष्ट सांगितली ती फार कमी लोकांना आणि चाहत्यांना माहिती असेल. कोहली त्याच्या आयुष्यात काही वेळा परिस्थितीपुढे हतबल झाला होता, त्याबाबत त्याने आठवण सांगितली.

“सुरूवातीच्या काळात मी जेव्हा क्रिकेट खेळायला लागलो, तेव्हा मला दिल्लीच्या राज्याच्या संघात निवडण्यात आले नव्हते. त्यावेळी मी पूर्णपणे हतबल झालो होतो. कोणतीच गोष्ट मनासारखी होत नव्हती. मी त्या रात्री पूर्णवेळ फक्त रडत होतो. मी माझ्या प्रशिक्षकांनादेखील विचारलं की मला संघात का निवडलं गेलं नाही?, अशी आठवण विराटने एका प्रसारमाध्यमाशी ऑनलाइन व्हिडीओ चॅट दरम्यान सांगितले.

विराटने करोनाशी देण्यात येणाऱ्या लढ्याबाबतही आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, “करोनाच्या तडाख्यात संपूर्ण देश होरपळून निघत आहे, पण त्यात एक गोष्ट सकारात्मक झाली आहे की सारे नागरिक एकत्र येऊन याचा सामना करत आहे. या लढ्यात आपण करोनायोद्ध्यांना म्हणजेच पोलीस, डॉक्चर्स आणि नर्सेस यांच्या प्रती अधिक आदर व्यक्त करू लागलो आहोत”, असे विराट म्हणाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *