संतापजनक : कर्तव्यावरुन परतणाऱ्या शिक्षकाला पोलीस अधिकाऱ्याची मारहाण..!



 

| बीड | महाराष्ट्रात कोरोना सैनिक म्हणून डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्या सह शिक्षक देखील वेगवेगळ्या भूमिका वठवत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा परिषदेने नाकाबंदी वर पोलीस मित्र म्हणून नियुक्त केलेल्या पथकातील शिक्षकांनाच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांना कोणतेही कारण न ऐकू घेता पोलिसांकडून मारहाण झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, आष्टी तहसीलदार यांनी खाजगी शाळेतील शिक्षकांना देखील चेकपोस्टवर कार्यरत राहण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार शिक्षक अनिल लोखंडे आणि महेश लटपटे हे सकाळी दहा ते रात्री दहा अशी ड्युटी करून परत आपल्या गावाकडे निघाले असता, अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली यामध्ये लटपटे गंभीर जखमी झाले असल्याची तक्रार त्यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली.

विशेष म्हणजे या शिक्षकांनी आपण शासकीय कर्तव्यावर असल्याचे ओळखपत्र दाखवून देखील पीएसआय लोखंडे यांनी त्यांचं ऐकून न घेता त्यांना बेदम मारहाण केली, असल्याचे तक्रारीत नमुद आहे. प्रशासनाला सहकार्य करत कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांना मारहाण झाल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.


7 Comments

  1. संबंधित पोलीस निरीक्षक वर गुन्हा दाखल करून तपास पूर्ण होईपर्यंत तात्काळ निलंबित करावे..

    1. संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर नक्की कारवाई व्हावी .

    2. निषेध निषेध ऐकुन घायला त्याचे काय गेले असते केस दाखल करायला पाहिजे

  2. त्या पोलिस अधिकाऱ्यावर नक्की कारवाई करावीच .

  3. पोलिसांनी अगोदर विचारले पाहिजे त्यानंतर शिक्षा केली पाहिजे, तसं न करता एखाद्या व्यक्तीला काठीने मारताहेत योग्य नाही

  4. This arrogance by police department. First of all listen to anyone. And then you should fill FIR against them if they committed an offence. Why should beat?

  5. अशा लोकांमुळे पोलीस खाते बदनाम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *