सर्वत्र ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध वाटप होणार..!
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा..!

| मुंबई | कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊ प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील सुमारे पाच कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे तात्काळ आवश्यक त्याप्रमाणे कमीत-कमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करुन खरेदी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सूचनेस अनुसरून आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे मोफत औषध जनतेला तात्काळ पुरवावे. या कार्यासाठी जमा केलेल्या रक्कमेतून खरेदीचा खर्च भागविण्यात येईल, असे ते म्हणाले.

. खर्च भागवून उर्वरित रक्कम ज्या-त्या जिल्हा परिषदांना जमा करण्यात येईल. ही प्रक्रिया आणि वाटप तीन आठवड्यामध्ये पूर्ण करावे, असेही जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.  यासंबंधीचा विभागाचा शासन निर्णय व आरोग्य मंत्रालय यांचे शासन निर्णय जिल्हा परिषदांना आवश्यक कार्यवाहीस्तव पाठविण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमियोपॅथीक अर्सेनिक अल्बम औषध चांगली कामगिरी करते असे आयुष मंत्रालयाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे हे औषधेखरेदी करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानेही घेतला होता. तशी निविदाही काढण्यात आली होती.  मात्र, ज्या दरामध्ये औषधे मिळणे आवश्यक होते तो उद्देश सफल होऊ शकला नाही. त्यामुळे ही खरेदी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आता यासाठी औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *