
| इंदापूर / महादेव बंडगर | भिगवण परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढती पेशंटची संख्या लक्षात घेऊन भिगवण आणि परिसरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये काॅट (बेड ) ची आवश्यकता होती. ही आवश्यकता लक्षात घेऊन रोटरी क्लब भिगवण ,रोटरी क्लब डेक्कन जिमखाना, रोटरी क्लब पिंपरी, रोटरी क्लब उद्योगनगरी, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज भिगवण कोविड सेंटरला 25 नवीन काॅट देण्यात आल्या.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, माजी अध्यक्ष प्रदीप वाकसे, प्रवीण वाघ ,डॉक्टर अमोल खानावरे, सरपंच प्रतिनिधी संतोष धवडे, रणजित भोंगळे,संजय खाडे औदुंबर हुलगे, डॉक्टर घोगरे आदी उपस्थित होते.
रोटरीयन मंजु फडके व रोटेरीयन नितीन ढमाले यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले असे या वेळी सचिन बोगावत यांनी सांगितले. तर कोविड सेंटरला आवश्यक मदत रोटरी क्लबचे माध्यमातून नेहमीच केली आहे. आगामी काळात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठीही मदत करू असे अध्यक्ष संपत बंडगर यांनी याप्रसंगी सांगितले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री