
आज संपूर्ण भारत देशात कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनाची अवाजवी अनामिक भीती निर्माण झाली आहे. कोविड-19 या अदृश्य,सुक्ष्मतम विषाणूने मानवजातीला हैराण करून सोडले आहे. कोणीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडतांना दिसत नाही. मानवाची प्रवृत्ती ही स्वार्थी, लोभी आहेच त्यात आता भित्रेपणाची जोड मिळाली आहे. मागील दोन ते तीन महिन्यात देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाने शिरकाव केलेला आहे.
देशातील सर्वाधिक रुग्ण आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात दाटीवाटीने लोकसंख्या ठासून भरली आहे. अमेरिकेतील न्यूयार्क मधील स्थिती ज्याप्रमाणे आहे तीच स्थिती दिवसरात्र धावणाऱ्या मुंबईमध्ये दिसून येत आहे. मुंबईची धास्ती अख्या महाराष्ट्रात पसरली असून प्रत्येक जण दुसऱ्याला खोचक व वक्रदृष्टीने बघतो आहे. शासनाने पूर्वी केलेल्या लाल, नारंगी व हिरवा या तीन क्षेत्रात विभागणी करण्यात आली होती पण जो जिल्हा लाल क्षेत्रात आहेत तेथील रहिवाशी यांना जर आपल्या नोकरी निमित्य वा इतर कामानिमित्य यायचे झाल्यास त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. दररोज एकमेकांच्या पुढे असलेली घरे यात जर शहरातुन कोणी आले असेल तर त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याचे सौजन्य देखील दाखवत नाहीत.
सध्या स्थितीत कोरोनासदृश परिस्थिती असल्याने माणूस माणसापासून दूर पळत असल्याचे वास्तव चित्र दिसते आहे. हातावर पोट असलेले गरीब कामगार, मजूर, स्थलांतरित शेतमजूर शहराकडे रोजगारासाठी गेलेले मजूर परत गावाकडे जीव वाचविण्यासाठी परत आलेले आहेत पण त्यांना गावात येण्यासाठी देखील मज्जाव केलेला आहे. कोविड-19 विषाणूचे कोणतेही लक्षण दिसत नसतांना देखील स्वतःच्या घरी येण्यासाठी देखील गावातून विरोध होत आहे. एवढेच नाही तर रात्रीच्या वेळी घरी येऊन चुपचाप घरीच होम क्वारनटाईन झाले असले तरी शेजारी, गावातील लोक वेगवेगळ्या कामाने घराबाहेर पडले की त्यांच्या नाना चर्चा सुरू होतात. जसे बाया विहिरीवरून पाणी आणायला जातांना-येतांना पुणे, मुंबई वरून आलेल्या लोकांच्या बाबत चर्चेला उधाण आलेले दिसून येत आहे.अशीच परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यातील सर्व गावात चालू आहे.
परवाची एक गोष्ट..! रेड झोन जिल्ह्यातील एक कृषी विभागातील कर्मचारी शेतीचे काम सुरू झाल्याने यवतमाळ वरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात रुजू झालेत. त्यामुळे स्वतःची, इतरांची सुरक्षितता राखण्यासाठी प्राथमिक अहवालाची चौकशी करून गृह अलगीकरण करण्यात आले तेव्हापासून त्यांच्याकडे वक्रदृष्टीने शेजारी बघायला लागलेत आणि त्यांना गृह विलगिकरणात असतांना जीवनाश्यक वस्तू घेण्यासाठी पाणी, अन्नधान्य, भाजीपाला यासाठी देखील समाजामध्ये मूक संघर्ष करावा लागला आणि अत्यंत मानहानीकारक चौदा दिवस चौदा निरनिराळ्या बाबी ऐकायला त्यांना मिळत होत्या म्हणजेच स्थानिक परिस्थितीत समाजात राहणाऱ्या लोकांनी त्याला कोरोनाग्रस्तच आहे असं समजून त्यांच्याशी वर्तन खूप निंदाजनक होते. तेव्हा त्यांना समाजातील लोकांची माणुसकी प्रत्यक्षात बघायला मिळाली.बेरोजगारीने सीमा गाठली असल्याने जवळच्या राज्यात शेतमजूर म्हणून गेलेल्या लोकांनी आपापल्या गावातील जाण्यासाठी गेले पण गावातील लोकांनी कोणतीही बाब समजून न घेता त्यांना गावकुसाबाहेर ढकललेले आहे अश्या पद्धतीने त्या शेतमजुराला दिलेली वागणूक देखील खूपच निंदनीय आहे. एवढेच नाही तर शहरात रोजगारासाठी गेलेल्या मजुराला काही प्रमाणात बस, रेल्वेची सुविधा दिली असली तरी काही मजूर, लहान मुले, गरोदर माता यांना पाचशे-पाचशे किलोमीटर पायी चालावे लागले नसते, अश्याच एका गरोदर महिलेची करूण कहाणी प्रत्यक्षात बघायला मिळाली. महामार्गावर पायी जातांना अचानक कळा सुरू झाल्याने असह्य वेदना सहन करून बाळाला जन्म देणाऱ्या मजूर आईला देखील असह्य त्रास सहन करावा लागला परंतु या कोरोना काळात माणुसकीची पावले वळतांना दिसत नाही आहेत. आज कोरोनाग्रस्त रुग्ण मयत झाल्यास त्यांच्या जवळ जाण्याचे सोडा, अंत्यसंस्कार देखील करायला धजावत नाहीत.
मागील आठवड्यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात होत असलेली वाढ बघता माणूस बाहेर पडायला देखील भीती वाटत होती अशातच आरमोरी तालुक्यातील एक दाम्पत्य यांच्या दुचाकी वाहनाचा झालेला अपघात एक समाजाला काळीमा फासणाराच होता. आरमोरी-गडचिरोली रोड वरुन जात असतांना अपघात झाल्याने स्त्रीच्या डोक्याला दुखापत होऊन रक्त वाहू लागले. ही सकाळची अकरा वाजताची वेळ असल्याने प्रथम कुरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले परंतु सर्व डॉक्टर कोरोना पेशंटच्या उपचारासाठी व्यस्त असल्याने तिला गडचिरोली जिल्ह्याची सीमा ओलांडून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्या गेले पण तिथे रेड झोन मधील रुग्ण असल्याने उपचार करण्यास कोरोना योध्दे म्हणून गणल्या गेलेले डॉक्टरने नकार दिला गेला. तदनंतर ब्रम्हपुरी येथील ख्रिश्चन हॉस्पिटल ला नेण्यात आले पण तेथेही डॉक्टरने रेड झोन मधील अपघाती रुग्ण असल्याने कोरोनाची अनासायास भीती निर्माण झाल्याने डॉक्टरांनी देखील उपचार करण्यास नकार दिला. सकाळी अकरा वाजता पासून तर तीन वाजेपर्यत या ना त्या दवाखान्यात चकरा मारत बसल्याने डोक्यातील वाहणारे रक्त गोठले आणि त्याच ब्रम्हपुरीतील एका खाजगी डॉक्टरने रुग्णाला तपासले असता मृत घोषित केले. केवळ रेड झोनमधील रुग्ण असल्याने उपचार देऊ न शकणाऱ्या निर्दयी डॉक्टरांच्या भूमिकेमुळे आज त्या महिलेचा मृत्यू झाला अशा नाना घटना समाजात घडत असून माणसातील माणुसपण आटत चालले आहे. या कोरोनाच्या उत्तरार्धात समाजाची माणुसकी लोप पावत असतांनाचे वास्तव चित्रण दिसून येत आहे, जे अधिकचे भयावह आहे.
– दुशांत निमकर , चंद्रपूर

हैदराबाद मुक्तिसंग्राम – जनतेचा संग्राम
१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतातील ५६५ संस्थाना पैकी ५६३ संस्थानिकांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्यासाठी माउंट बॅटन यानी मुभा दिली. जवळपास काही संस्थाने भारतात विलीन झालेले होते. त्यापैकी काश्मीर, हैदराबाद, जुनागड हे संस्थान भारतामध्ये अजून विलीन झालेले नव्हते. जुनागड संस्थानिक महाबतखान जुनागडचा नबाब होता. या संस्थानांमध्ये ८० टक्के हिंदू २० […]

हे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ ऑक्सिजन ची पातळी वाढविण्यासाठी आहेत महत्वाचे..!
| मुंबई | कोरोना विषाणूमुळे सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या संकट काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि मनोबल टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपण कोरोनासारख्या विषाणूवर निश्चितच मात करु शकतो. त्यामुळे सध्याच्या काळात जास्तीत जास्त सकस व पौष्टिक पदार्थांचं सेवन करुन आपली इम्युनिटी पॉवर म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवली […]

सावधान!… गुप्तहेर गूगल तुमचा पाठलाग करत आहे…
तुम्ही एखादा नवीन काँटॅक्ट तुमच्या फोनबूकमध्ये सेव्ह केलात, की त्या व्यक्तीचे फेसबूक प्रोफाईल, ‘पीपल यू मे नो’ मध्ये दिसते, हे सगळ्यांना माहितीच आहे, पण त्याच्याही पलिकडे जाऊन आपले सर्व ऑफलाईन बोलणे आणि हालचालीसुद्धा ट्रॅक होत असतात… गेल्या काही दिवसांत मला आलेले काही अनुभव: १) एका मैत्रिणीबरोबर गप्पा मारत असताना, तिने तिच्या बहिणीसंदर्भात काही माहिती सांगितली. […]