केंद्राने जाहीर केली लॉकडाऊन ५ ची नियमावली..! हे होणार चालू नि हे राहणार बंद..!

| मुंबई | येत्या ८ जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

पहिला लॉकडाऊन – २५ मार्च ते १४ एप्रिल
दुसरा लॉकडाऊन – १५ एप्रिल ते ३ मे
तिसरा लॉकडाऊन – ४ मे ते १७ मे
चौथा लॉकडाऊन – १८ मे ते ३१ मे
पाचवा लॉकडाऊन – १ जून ते ३० जून

लॉकडाउन ५ आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. इतरत्र टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील. ८ जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे तसंच मास्क घालणंही अनिवार्य असणार आहे. असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ३० जून पर्यंत फक्त कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल. कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन अधिक कठोर करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल.

पहिल्या टप्प्यात काय उघडणार:
– आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
– हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
– शॉपिंग मॉल उघडणार.

दुसऱ्या टप्प्यात काय उघडणार :
– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील.

तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार :
सर्व परिस्थितीचे आकलन करुन या गोष्टी कधी सुरु करायच्या त्या संदर्भात निर्णय घेण्यात येतील.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
– सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
– क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.