लॉक डाऊन -४ : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे – फेसबुक लाईव्ह

| मुंबई | राज्यातील ग्रीन झोनमध्ये लवकरच पुन्हा उद्योग सुरु होतील. परंतु, परराज्यातील कामगार गावी परतल्याने याठिकाणी मनुष्यबळाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. राज्यातील भूमिपूत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र पुन्हा उभा करु, अशा निश्चयाने नोकरीसाठी घराबाहेर पडा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरुणांना केले. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे: 

  • मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार, या निश्चियाने बाहेर पडा, ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे.
  • आपल्या समोर दोन मोठी आवाहन आहे, ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचा आहे, या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळला नाही.
  • ग्रीन झोन मध्ये एकही रुग्ण वाढू द्यायचा नाही आणि रेड झोन ग्रीनमध्ये आणायचा आहे.
  • आजपर्यंत आपण ५० हजार उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे, त्यामध्ये साधारण 5 लाख कामगार काम करत आहेत.
  • ग्रीन झोन मध्ये शिथीलता आणली आहे, ऑरेंजझोनमध्ये खबरदारी घेत आहोत, मात्र रेडझोनमध्ये नाहीच.
  • मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे.
  • जर लॉकडाऊन केलं नसतं हे आकडे जास्त असते.
  • घरात राहा सुरक्षित राहा हे आतापर्यंत पाळलं, यापुढे घराबाहेरही सावध राहा.
  • हात सतत धुवत राहा, तोंडाला रुमाल, मास्क लावा, हात वारंवार चेहऱ्यावर फिरवू नका. हे आपल्याला पुढील काही महिने पाळावं लागेल.
  • परदेशातूनही लोक आपण आणत आहोत, मात्र विलगीकरण हे आवश्यक आहे.
  • तुम्हाला काही लक्षण नसली तरी तुम्ही वाहक होऊ नका. 
  • तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल.
  • काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले.
  • मजूरांकडून तिकीट घेतलेले नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च केला आहे.
  • मुंबईत राहणारी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील लोकांनाही घरी पाठवणार, पण अस्वस्थ होऊ नका.
  • जे मजूर रस्त्याने चालत जात आहेत, त्यांनी कृपा करुन तो मार्ग पत्करु नये, तुमच्यासाठी रेल्वे, बसची सुविधा केली आहे. आहे तिथेच थांबा, तुम्हाला पूर्ण सुरक्षितपणे तुमच्या राज्यात पाठवू.. मजुरांची आपण काळजी घेतली, ५-६ लाख मजुरांची जेवणा खाणाची सोय केली.
  • मी जर समजा हा लॉकडाऊन उठवला तर इतर देशांसारखी महाराष्ट्राची परिस्थिती होईल.
  • मी महाराष्ट्रासाठी टीकेचा धनी होईन, मात्र मला जे योग्य वाटेल ते ते मी करणारच. लॉकडाऊन हटवणार नाही, माझ्यावर टीका झाली तर होऊ दे.. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीका सहन करेन, रेड झोनमध्ये तूर्तास सूट नाही..
  • रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स इतर आरोग्य सोयी सुविधा वाढवत आहे.
  • राज्यभर आरोग्य सुविधा वाढवत आहोत, शक्य ती सर्व पावलं उचलत आहोत.
  • डॉक्टर, नर्स, पोलिसांना त्या त्या वेळी विश्रांती देणे गरजेचे आहे. मला कोव्हिड योद्ध्यांची गरज आहे, ज्यांना कुणाला मदतीला यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे.
  • संकट आहे, काही ठिकाणी बेड मिळत नाही अशा तक्रारी आहेत, पण त्या सुद्धा दूर होतील. ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या बेडची सुविधा जास्तीत जास्त करत आहे. रुग्णालयाबाहेर जर इतरत्र सेंटर्समध्ये सोयी सुविधा दिल्या आहेत. आयसीयू बेड वाढवत आहोत, इतरत्र कुठे नसेल तशी आरोग्य व्यवस्था उभी करायची आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *