दिलासादायक : रिकव्हरी रेट कमालीचा सुधारतोय..!

| नवी दिल्ली | आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज दिलेल्या माहितीनुसार , ‘आता देशात संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मागील एका महिन्यात रिकव्हरी रेट ११% वाढला. १८ मे रोजी ३८.२९% रिकव्हरी रेट होता. आज सकाळी ४९.२१% झाला आहे. आतापर्यंत देशात १.४१ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना ठीक झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १ लाख ३७ हजार ४४८ अॅक्टिव केस होते आणि एक लाख ४१ हजार २८ रुग्ण ठीक झाले आहेत.(recovery rate)

याप्रकारे जेव्हापासून लॉकडाउन सुरू झाला, तेव्हापासून संक्रमित रुग्णांसोबतच ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत गेली. लॉकडाउन ४ संपेपर्यंत ९३ हजार ३२२ रुग्ण ठीक झाले होते. म्हणजेच, अनलॉक-१ मध्ये ४७ हजार ७०७ रुग्ण ठीक झाले. दरम्यान, covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या २ लाख ८७ हजार ७५४ कोरोना रुग्ण आहेत. बुधवारी पहिल्यांदा ११ हजार १५६ पेक्षा जास्त रुग्ण मिळाले.(recovery rate)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *