या प्रसिद्ध क्रिकेट खेळाडूला कोरोनाची लागण..!

| कराची | पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाहिद आफ्रिदी याने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मी लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंतीही शाहिदने चाहत्यांना केली आहे. या बातमी शाहिदच्या अनेक चाहत्यांनी ट्विट करत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे की, “गुरुवारपासून मला बरे वाटत नाहीये. माझं अंग खूपच दुखत आहे. माझी कोरोना टेस्ट करण्यात आली आणि दुर्दैवाने कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लवकरच बरा होण्यासाठी प्रार्थनांची आवश्यकता आहे”. दरम्यान, शाहिद आफ्रिदीचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह येणारा दुसरा पाकिस्तानचा खेळाडू आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी फलंदाज तौफिक उमर याला देखील कोरोनाची लागण झाली होती. तौफिक उमर हा उपचारानंतर बरा होऊन घरी परतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *