कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८% – केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन

| नवी दिल्ली | भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५८ टक्के झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. एवढेच नाही तर सध्याच्या घडीला साधारणत: देशभरातले तीन लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३ टक्के आहे, जो अत्यल्प आहे असेही हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा १९ दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाऊनच्या आधी हे प्रमाण ३ दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढते आहे. ही बाब भारतासाठी चांगलीच आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे १० हजार २४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ३ लाखांच्या आसपास रुग्ण देशभरात बरे झाले आहेत अशीही माहितीही हर्षवर्धन यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *