व्हॉट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून कोरोना ची जनजागृती ; कोरोना योद्धा प्रियंका गवळींचा स्तुत्य उपक्रम

| अमरावती | खर तर नेहमी सोशल मीडियाचा सर्वात मोठा वापर हा मनोरंजन करण्याकरिता केला जातो, परंतु काही योग्य व्यक्ती या प्रभावी माध्यमाचा नक्कीच चांगल्या कामासाठी उपयोग करताना दिसून येतात असाच प्रभावी आणि परिणामकारक वापर वाशीम जिल्ह्यातील अमरावती येथील राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागात अधिकारी असलेल्या प्रियांका गवळी यांनी केला आहे.

त्यांनी व्हॉटसअपचा वापर कोरोना च्या जनजागृती साठी केला आहे त्यांनी तब्बल ११५ व्हॉटसअप ग्रुप बनवून त्या माध्यमातून वाशीम जिल्ह्यात जागृती केली त्याच बरोबर महिलांमध्ये आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी अनेक लेख आणि भाषणाच्या माध्यमातून तयारी करून घेतली.

महत्वाचे म्हणजे आई गमावलेल्या आणि वडिलांचा आधार नसलेल्या २ लहान मुलांचे पालकत्व स्वीकारून आपले दातृत्व सिद्ध केलं आहे. त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्यामुळे आज अनेक महिला उद्योगाला लागल्या असून त्यांच्यात आत्मविश्वस निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत

त्यांच्या या अनोख्या उपक्रमांची अनेक सामाजिक संस्थांनी दखल घेऊन त्यांना सन्मानित केले आहे.श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश संकपाळ यांनी फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या कु.प्रियांका गवळी यांचा कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे. अशा या जिजाऊ ,सावित्री च्या लेकीचे अमरावती, वाशीम सह अनेक ठिकाणी सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *