#coronavirus- १ मे आजची आकडेवारी..!



| मुंबई | महाराष्ट्रात आज (१ मे) एकाच दिवसात १ हजार ८ कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली आहे . या व्यतिरिक्त आज दिवसभरात १०६ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात १ हजार ८७९ रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ९ हजार १४८ कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आत्तापर्यंत राज्यभरात एकूण १ लाख ५३ हजार १२५ नमुन्यांच्या कोरोना चाचणी झाल्या. त्यापैकी १ लाख ४० हजार ५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, ११ हजार ५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या ४८५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्गमधील १, भिवंडी महानगरपालिकेतील १, ठाणे मनपामधील १, नांदेडमधील १,औरंगाबाद मनपामधील १ आणि १ मृत्यू परभणी येथील आहे. या शिवाय मुंबईमध्ये उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १८ पुरुष, तर ८ महिला आहेत. आजच्या २६ मृत्यूंपैकी १४ रुग्ण ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत, ११ रुग्ण वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. एक जण ४० वर्षांखालील आहे. या २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये (५८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७९२ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण १० हजार ८४९ सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी ४५.३४ लाख लोकसंख्येचं सर्वेक्षण केलं.



राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 7812 374 295
पुणे (शहर+ग्रामीण) 1244 125 96
पिंपरी चिंचवड मनपा 72   3
ठाणे (शहर+ग्रामीण) 489 36 9
नवी मुंबई मनपा 193   3
कल्याण डोंबिवली मनपा 179   3
उल्हासनगर मनपा 3    
भिवंडी निजामपूर मनपा 17   1
मीरा भाईंदर मनपा 135   2
पालघर 44 1 1
वसई विरार मनपा 135   3
रायगड 26 5 1
पनवेल मनपा 48   2
नाशिक (शहर +ग्रामीण) 41 2  
मालेगाव मनपा 201   12
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 42 16 2
धुळे 26   3
जळगाव 44 1 12
नंदूरबार 11   1
सोलापूर 108   6
सातारा 32 3 2
कोल्हापूर 15 2  
सांगली 29 27 1
सिंधुदुर्ग 2 1  
रत्नागिरी 8 2 1
औरंगाबाद 131 14 7
जालना 2    
हिंगोली 15 1  
परभणी 2    
लातूर 12 8 1
उस्मानाबाद 3 3  
बीड 1    
नांदेड 3    
अकोला 39 1 1
अमरावती 28   7
यवतमाळ 79 8  
बुलडाणा 21 8 1
वाशिम 2    
नागपूर 139 12 2
भंडारा 1    
गोंदिया 1 1  
चंद्रपूर 2 1  
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 26   2
एकूण 11506 1879 485

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *