#coronavirus- २६ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!| मुंबई |महाराष्ट्रात आज ४४० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ८ हजार ६८ झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

आज राज्यात १९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १९ पैकी १२ मृत्यू मुंबईत, पुण्यात ३, जळगावात २, सोलापूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ११८८ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ९१६० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.

आकडेवारी:

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ५४०७ (२०४)
ठाणे : ७३८ (१४)
पालघर : १४१ (४)
रायगड : ५७ (१)
नाशिक : १३१ (१२)
अहमदनगर : ३६ (२)
धुळे : २५ (३)
जळगाव : १९ (४)
नंदूरबार : ११ (१)
पुणे : १०५३ (७६)
सोलापूर : ४७ (५)
सातारा : २९ (२)
कोल्हापूर : १०
सांगली : २७ (१)
सिंधुदुर्ग : १
रत्नागिरी : ८ (१)
औरंगाबाद : ५० (५)
जालना : २
हिंगोली : ८
परभणी : १
लातूर : ९ (१)
उस्मानाबाद : ३
बीड : १
नांदेड : १
अकोला : २९ (१)
अमरावती : २० (१)
यवतमाळ : ४८
बुलढाणा : २१ (१)
वाशिम : १
नागपूर : १०७ (१)
वर्धा : ०
भंडारा : ०
गोंदिया : १
चंद्रपूर : २
गडचिरोली : ०
एकूण : ८०६८ (३४२)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *