#coronavirus- २७ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!| मुंबई | महाराष्ट्रात करोनाचे ५२२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ८५९० एवढी झाली आहे. आज करोनामुळे २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे. २४ तासात ९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

आज झालेल्या २७ रुग्णांच्या मृत्यूंपैकी १५ रुग्ण मुंबईतले आहेत, ६ रुग्ण अमरावतीत, ४ रुग्ण पुण्यात, १ रुग्ण जळगावात आणि १ मृत्यू औरंगाबादमध्ये झाला आहे. ज्या २७ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी १५ पुरुष तर १२ महिला होत्या. २७ मृत रुग्णांपैकी १३ रुग्ण असे होते ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त होते. ६ रुग्ण हे ४० ते ५९ वर्षे वयोगटातील होते. ज्या २७ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी २२ रुग्णांना अस्थमा, हायपर टेन्शन, मधुमेह, टीबी यांसारख्या गंभीर आजारांचा पूर्व इतिहास होता असेही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *