#coronavirus- २९ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!



| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९९१५ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात ३२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी २६ जण मुंबईचे तर पुण्यातील ३ आणि सोलापूर, औरंगाबाद, पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज २०५ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख ३७ हजार १५९ नमुन्यांपैकी १ लाख २६ हजार ३७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर ९९१५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६२ हजार ८६० व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून १० हजार ८१३ जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत १५९३ कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 6644 374 270
पुणे (शहर+ग्रामीण) 1120 125 82
पिंपरी चिंचवड मनपा 72   3
ठाणे (शहर+ग्रामीण) 419 36 6
नवी मुंबई मनपा 162   3
कल्याण डोंबिवली मनपा 158   3
उल्हासनगर मनपा 3    
भिवंडी निजामपूर मनपा 15    
मीरा भाईंदर मनपा 125   2
पालघर 41 1 1
वसई विरार मनपा 128   3
रायगड 23 5  
पनवेल मनपा 46   2
नाशिक (शहर +ग्रामीण) 24 2  
मालेगाव मनपा 171   12
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 42 16 2
धुळे 25   3
जळगाव 40 1 9
नंदूरबार 11   1
सोलापूर 85   6
सातारा 32 3 2
कोल्हापूर 12 2  
सांगली 29 27 1
सिंधुदुर्ग 2 1  
रत्नागिरी 8 2 1
औरंगाबाद 105 14 7
जालना 2    
हिंगोली 15 1  
परभणी 1    
लातूर 12 8 1
उस्मानाबाद 3 3  
बीड 1    
नांदेड 3    
अकोला 39 1 1
अमरावती 28   7
यवतमाळ 79 8  
बुलडाणा 21 8 1
वाशिम 2    
नागपूर 138 12 1
भंडारा 1    
गोंदिया 1 1  
चंद्रपूर 2 1  
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 25   2
एकूण 9915 1593 432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *