#coronavirus_MH – ११ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1230 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आज झालेल्या मृत्यूपैकी 20 जण मुंबईचे तर पुण्यातील 3, सोलापूर 5, ठाणे 2, अमरावती ,औरंगाबाद, नांदेड, रत्नागिरी आणि वर्धा शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. राज्यात आतापर्यंत 868 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 587 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 18 हजार 917 नमुन्यांपैकी 1 लाख 93 हजार 457 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 23,401 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 48 हजार 301 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 15 हजार 192 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 4786 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 23 पुरूष तर 13 महिला आहेत. त्यातील 17 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 16 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 43 रुग्ण 40 वर्षाखालील आहे.  36 रुग्णांपैकी 27 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत. 

राज्यातील कोरोनाबाधितांची अद्यावत आकडेवारी

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 14521 374 528
पुणे (शहर+ग्रामीण) 2642 938 154
पिंपरी चिंचवड मनपा 147 34 4
ठाणे (शहर+ग्रामीण) 1052 36 12
नवी मुंबई मनपा 898 80 4
कल्याण डोंबिवली मनपा 366 91 3
उल्हासनगर मनपा 30   0
भिवंडी निजामपूर मनपा 32 11 2
मीरा भाईंदर मनपा 214 143 2
पालघर 37 1 2
वसई विरार मनपा 249 105 10
रायगड 123 5 1
पनवेल मनपा 139   2
नाशिक (शहर +ग्रामीण) 100 2 0
मालेगाव मनपा 596   34
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 63 36 3
धुळे 54   6
जळगाव 180 1 19
नंदूरबार 22   2
सोलापूर 296 41 16
सातारा 121 3 2
कोल्हापूर 19 2 1
सांगली 37 29 1
सिंधुदुर्ग 6 2 0
रत्नागिरी 42 2 2
औरंगाबाद 584 14 14
जालना 14   0
हिंगोली 60 1 0
परभणी 2   1
लातूर 31 8 1
उस्मानाबाद 3 3 0
बीड 1   0
नांदेड 45   4
अकोला 162 14 11
अमरावती 83   13
यवतमाळ 97 22 0
बुलडाणा 25 8 1
वाशिम 1   0
नागपूर 259 84 2
भंडारा 1   0
गोंदिया 1 1 0
चंद्रपूर 4 1 0
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 42   9
एकूण 23401 4786 868

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *