#coronavirus_MH – १३ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1495 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,922 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 54 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 40 जण मुंबईचे तर पुण्यातील 6, जळगाव 2, सोलापूर 2, औरंगाबाद 2, वसई विरारमध्ये आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 975 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 339 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 30 हजार 857 नमुन्यांपैकी 2 लाख 03 हजार 439 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 25, 922 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 213 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 14 हजार 627 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 5125 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 15747 374 596
पुणे (शहर+ग्रामीण) 3010 938 166
पिंपरी चिंचवड मनपा 151 34 4
ठाणे (शहर+ग्रामीण) 1279‬ 36 13
नवी मुंबई मनपा 1018 80 4
कल्याण डोंबिवली मनपा 412 91 3
उल्हासनगर मनपा 72   0
भिवंडी निजामपूर मनपा 39 11 2
मिरा भाईंदर मनपा 245 143 2
पालघर 40 1 2
वसई विरार मनपा 286 105 11
रायगड 158 5 2
पनवेल मनपा 150   8
नाशिक (शहर +ग्रामीण) 134 2 0
मालेगाव मनपा 617   34
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 64 36 3
धुळे 71   6
जळगाव 206 1 26‬
नंदूरबार 22   2
सोलापूर 320 41 21
सातारा 125 3 2
कोल्हापूर 22 2 1
सांगली 41 29 1
सिंधुदुर्ग 7 2 0
रत्नागिरी 60 2 3
औरंगाबाद 680‬ 14 17
जालना 16   0
हिंगोली 61 1 0
परभणी 2   1
लातूर 32 8 1
उस्मानाबाद 4 3 0
बीड 1   0
नांदेड 57   4
अकोला 192‬ 14 12
अमरावती 89   13
यवतमाळ 99 22 0
बुलडाणा 25 8 1
वाशिम 3   0
नागपूर 317 84 2
वर्धा 1 0 1
भंडारा 1 0 0
गोंदिया 1 1 0
चंद्रपूर 4 1 0
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 41 0 10
एकूण 25922 5125 975

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *