#coronavirus_MH – २४ मे आजची आकडेवारी..! तब्बल ३०४१ ने वाढ..!

| मुंबई | देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या 3 हजार 41 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे.

राज्यात आज दिवसभरात 1196 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 33 हजार 988 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिवसभरात राज्यात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 हजार 635 वर पोहोचला आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईत 39, पुण्यात 6, सोलापूरात 6, औरंगाबादमध्ये 4, लातूरमध्ये 1, मीरा-भाईंदरमध्ये 1, ठाण्यात 1 मृत्यू झाला आहे.

राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोक होम क्वारंटाईनमध्ये

आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 62 हजार 862 नमुन्यांपैकी 3 लाख 12 हजार 631 जणांचे प्रयोगशाळा नमूने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर 50 हजार 231 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 107 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबई दिवसभरात 1 हजार 566 रुग्णांची वाढ

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 725 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 30 हजार 542 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात एकूण 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 988 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *